ETV Bharat / city

कोल्हापुरात रविवारी आणखी तिघांचा कोरोनाने मृत्यू, 123 नवीन रुग्णांची वाढ - corona in kolhapur

जिल्ह्यातील एकूण 2264 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 999 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 53 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या 1212 इतकी आहे.

kolhapur corona
कोल्हापूर
author img

By

Published : Jul 20, 2020, 1:28 AM IST

कोल्हापूर - रविवारी आणखी 123 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी आढळलेल्या 123 रुग्णांनंतर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2264 झाली आहे, तर त्यातील 999 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1212 झाली आहे.

दरम्यान, मृत्यू झालेल्या तीन रुग्णांमध्ये शिरोळ तालुक्यातील 80 वर्षांचा वृद्ध, इचलकरंजी येथील 50 वर्षांच्या व्यक्ती आणि इतर राज्यातील एका 82 वर्षांच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे. रविवारी दिवभरात एकूण 452 जणांच्या स्वॅबचे अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यातील 123 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत, तर 319 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामध्ये 9 जणांचे अहवाल रिजेक्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सद्या एकट्या इचलकरंजी शहरात आढळले असून, तेथील एकूण रुग्णांची संख्या 366 इतकी झाली आहे.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 100
भुदरगड- 85
चंदगड- 274
गडहिंग्लज- 157
गगनबावडा- 7
हातकणंगले- 88
कागल- 67
करवीर- 250
पन्हाळा- 90
राधानगरी- 84
शाहूवाडी- 221
शिरोळ- 66
नगरपरिषद क्षेत्र- 455
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-278
असे एकूण 2222

इतर जिल्हा व राज्यातील 42 असे मिळून एकूण 2264 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.