कोल्हापूर- एखाद्या गरजू रुग्णाला हवा असणारा रक्तगट ऐनवेळी शोधण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते. अनेक संस्थांचे उंबरे झिजवावे लागतात. आयत्या वेळी करायचे काय? असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो. मात्र यावर राज्यात प्रथमच ब्लड डोनर कोल्हापूर ॲप चा एक वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. या अॅपच्या माध्यमातून गरजू रुग्णांना तत्काळ मोफत रक्त पुरवठा केला जाणार आहे. कोल्हापुरातील जिव्हेश्वर फाऊंडेशनचे रजत ओस्वाल श्वेताने तानी यांनी रोटरी क्लब यांच्या सहकार्यातून या ॲपची निर्मिती केली आहे.
रुग्णांच्या मदतीला धावणार 'कोल्हापूर ब्लड डोनर अॅप', दोन तरुणांचा अविष्कार - तत्काळ मोफत रक्त पुरवठा
कोरोना काळात सामान्य रुग्णांची रक्त साठ्यासाठी धावपळ होताना पाहताच कोल्हापुरातील दोन तरुणांनी एकत्र येऊन गरजू रुग्णांना तात्काळ रक्त मिळण्यासाठी जालीम उपाय शोधला आहे. रक्तदान करण्यापासून ते रुग्णाला रक्त मिळेपर्यंत हा प्रवास एका क्लिकवर होणार आहे.