ETV Bharat / city

कोरोना नियमांचे पालन करत साजरा होणार कोल्हापुरातील शाही दसरा

author img

By

Published : Oct 13, 2021, 3:02 PM IST

Updated : Oct 13, 2021, 3:08 PM IST

कोरोना नियमांचे पालन करत यावर्षी दसरा सोहळा होणार असल्याची माहिती श्रीमंत शाहू छत्रपती यांनी पत्रक काढून दिली आहे. आज सकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा याबाबत माहिती दिली असून नागरिकांनीसुद्धा नियमांचे पालन करत या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर - करवीर नगरीतील ऐतिहासिक पारंपरिक दसरा सोहळा यावर्षी होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत यावर्षी दसरा सोहळा होणार असल्याची माहिती श्रीमंत शाहू छत्रपती यांनी पत्रक काढून दिली आहे. आज सकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा याबाबत माहिती दिली असून नागरिकांनीसुद्धा नियमांचे पालन करत या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

पारंपरिक दसरा प्रसिद्धीपत्रक
पारंपरिक दसरा प्रसिद्धीपत्रक

काय म्हटले आहे पत्रकात?

श्रीमंत शाहू छत्रपती यांनी दसरा सोहळा होणार याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला माहिती दिली. यामध्ये म्हटले आहे, की करवीर नगरीचा ऐतिहासिक दसरा सोहळा देश-विदेशात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र तसेच देशभरातील भाविकांचे करवीरच्या या ऐतिहासिक सोहळा कडे लक्ष असते. गतवर्षी कोरोनाच्या संकटकाळात ऐतिहासिक दसरा चौकात होणारा दसऱ्याचा सीमोल्लंघनाचा सोहळा केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जुना राजवाडा येथे साजरा करण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आल्याने तसेच राज्यातील सर्व देवस्थान व देवालय सुरू झाली असल्याने यंदा हा ऐतिहासिक सोहळा कोरोनाचे सर्व नियम पाळून 15 ऑक्टोबर रोजी पारंपरिक पद्धतीने संपन्न होणार आहे, असे म्हटले आहे.

'असा' असतो सोहळा

दरवर्षी पारंपरिक दसऱ्यासाठी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि गुरुमहाराज यांच्या पालख्या दसरा चौकात येत असतात. तसेच करवीर छत्रपती घराण्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला जातो. यावेळी सीमोल्लंघन म्हणजेच सोने लुटण्याचा सोहळा पार पडतो. त्यानंतर स्वतः शाहू छत्रपती जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा देत सोने अर्थात आपट्याची पाने वाटत असतात. पारंपरिक दसरा आपल्या कोल्हापूरच्या संस्कृतीचा परंपरेचा ऐतिहासिक असा ठेवा आणि वारसा आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये दसरा सोहळा हा कोरोनाचे नियम, सुरक्षित अंतराचे नियम पाळून होणार आहे. दरम्यान, सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

Last Updated : Oct 13, 2021, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.