ETV Bharat / city

महाराष्ट्र एकीकरण समितीमधल्या एकाच्याही केसाला धक्का लागला तर गाठ सेनेशी - धैर्यशील माने - News about Maharashtra Integration Committee

बेळगामध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या लोकांब बद्दल भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार धैर्यशील माने यांनी फेसबुकला पोस्ट टाकून जाही निषेध व्यक्त केला आहे. यात त्यांनी शांतता भंग न करण्याचे आवाहन केले आहे.

MP Mane criticized Bhim Shankar Patil
महाराष्ट्र एकीकरण समितीमधल्या एकाच्याही केसाला धक्का लागला तर गाठ सेनेशी - धैर्यशील माने
author img

By

Published : Dec 27, 2019, 9:51 AM IST

Updated : Dec 27, 2019, 1:00 PM IST

कोल्हापूर - बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना गोळ्या घाला असे वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावर अनेक जण भीमाशंकर पाटील यांचा निषेध करत आहेत. या बाबत खासदार धैर्यशील माने यांनी फेसबुकला पोस्ट टाकून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.

खासदार धैर्यशील माने

गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो " कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ". आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे. अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, महाराष्ट्र एकीकरण असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग*

महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे -धैर्यशील माने

खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा केला निषेध

फेसबुकवर याबाबत केली पोस्ट

कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात सांगा

तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं पाहू

कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यात आम्ही कटिबद्ध - धैर्यशील माने

महाराष्ट्र एकिकरण समितीच्या लोकांना गोळ्या घाला असं कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांनी केलं होतं वक्तव्य

धैर्यशील माने यांची फेसबुक पोस्ट

गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो " कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ". आजवर महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकिकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे.

अशा बेजबाबदार विधानांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. ShivSena Uddhav Thackeray महाराष्ट्र एकीकरण समिती,बेळगाव(महाराष्ट्र)!........ महाराष्ट्र एकीकरण समितीBody:.Conclusion:.
Last Updated : Dec 27, 2019, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.