ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : अंबाबाईच्या खजिन्यात 7 वर्षात 'इतक्या' किलो सोन्याच्या दागिन्यांची भर - gold and silver ornaments donate

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे अंबाबाईच्या चरणी दान करण्याचे प्रमाणही जास्त आहे. मागील सात वर्षात लाखो रुपयांचे दान देवीच्या चरणी अर्पण झाले आहे. मात्र, यंदाच्या वर्षात कोरोनामुळे तिजोरीत थोडीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.

mahalaxmi temple
अंबाबाईच्या खजिन्यात 7 वर्षात 'इतक्या' किलो सोन्याच्या दागिन्यांची भर
author img

By

Published : Dec 24, 2020, 6:35 AM IST

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. यावर्षी जवळपास 1 किलो 900 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 18 किलो चांदीच्या दागिन्यांची वाढ झाली आहे. दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात अंबाबाईच्या चरणी सोने-चांदीचे दागिने अर्पण करत असतात. गेल्या 7 वर्षांतील आकडेवारीनुसार अंबाबाई चरणी तब्बल 21 किलो सोन्याचे तर 144 किलो चांदीचे दागिने भाविकांनी अर्पण केले आहे. पाहुयात विशेष रिपोर्ट...

सोन्याच्या दागिन्यांची वाढ
सोन्याच्या दागिन्यांची वाढ
यावर्षी मोठी घट - दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात अंबाबाई चरणी दागिने अर्पण करत असतात, मात्र 2018-19 च्या तुलनेत यावर्षी (2019-20) मध्ये दान होणाऱ्या रकमेत मोठी घट पाहायला मिळाली आहे. यंदा जवळपास 42 लाख 71 हजारांची घट झाली आहे. गतवर्षी जवळपास साडे तीन किलो सोन्याचे दागिने अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आले होते. मात्र यावर्षी 1 किलो 900 ग्रॅम सोन्याचे दागिने अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आले आहेत. गेल्या 7 वर्षाचा विचार केल्यास यंदा सर्वात मोठी घट पाहायला मिळाली आहे.
अंबाबाईच्या खजिन्यात 7 वर्षात 'इतक्या' किलो सोन्याच्या दागिन्यांची भर
गेल्या 7 वर्षात कशा प्रकारे भाविकांनी दागिने अर्पण केले यावर एक नजर - 2013-14 या आर्थिक वर्षात सोने - 3041.090 ग्रॅमचांदी - 13913.150 ग्रॅम2014-15 या आर्थिक वर्षात सोने - 2128.230 ग्रॅमचांदी - 19911.450 ग्रॅम2015-16 या आर्थिक वर्षात सोने - 5047.725 ग्रॅमचांदी - 26034.100 ग्रॅम2016-17 या आर्थिक वर्षात सोने - 2203.935 ग्रॅमचांदी - 14667.440 ग्रॅम2017-18 या आर्थिक वर्षातसोने - 2626.880 ग्रॅम चांदी - 34406.370 ग्रॅम2018-19 या आर्थिक वर्षात सोने - 3557.810 ग्रॅमचांदी - 16281.1150 ग्रॅम2019-20 या आर्थिक वर्षात सोने - 1909.960 ग्रॅमचांदी - 18229.260 ग्रॅम2017 साली अंबाबाई चरणी 'सुवर्ण पालखी' -'अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्ट'च्या माध्यमातून सुवर्ण पालखी साठी 26 किलो सोन्याची गरज होती. त्यानुसार भक्तांना सोने दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तब्बल दोन वर्ष या माध्यमातून विविध ठिकाणांहून अंबाबाईच्या सुवर्ण पालखी साठी भाविकांनी सोने तसेच पैशांच्या स्वरूपात देणगी अर्पण केली. 2017 साली पालखीचे काम पूर्ण झाले आणि 'अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्ट'च्या माध्यमातून बनविण्यासाठी आलेली सोन्याची आकर्षक पालखी विधिवत पूजा करून अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आली.
सोन्याच्या दागिन्यांची वाढ
सोन्याच्या दागिन्यांची वाढ
अंबाबाईच्या खजिन्यात दीडशे किलोपेक्षाही जास्त सोने असण्याचा अंदाज - अंबाबाईच्या खजिन्यात सर्व सोनं मिळून सव्वाशे ते दीडशे किलो पेक्षाही जास्त सोनं असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सद्या मिळालेल्या आकडेवारीनुसार 21 किलो सोने केवळ 7 वर्षात अर्पण केले आहे. तसेच 26 किलो वजनाच्या सोन्यापासून बनवलेली पालखी सुद्धा अर्पण करण्यात आली आहे. 2013 पूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोने चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. त्याच्या मूल्यांकनाची आकडेवारी मिळू शकली नाही. मात्र अंबाबाईच्या खजिन्यात अनेक अमूल्य असे दागिने सुद्धा आहेत. त्याचबरोबर हिरेजडित दागीने, शिवकालीन कवड्यांची माळ ज्याची किंमत करणेही कठीण आहे असे दागिनेही आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.