कोल्हापूर - कधीही निवडूण न येणाऱ्या व्यक्तीने भाजप पुन्हा निवडून येणार नाही असे म्हणू नये, संजय राऊत यांनी कमीतकमी ग्रामपंचायत निवडणूक तरी लढवूण दाखवावी आणि मग मोठी बोलणी करावी. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसेच संजय राऊत हे घरं फोडायची काम करतात. त्यांनी या अगोदर उद्धव ठाकरे व राज ठाकरें फोडले व आता छत्रपती घराने फोडण्याचे काम करत आहेत, अशा शब्दात राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
संजय राऊत यांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. त्यांनी अगोदर ठाकरे यांचे घर फोडले आणि आता छत्रपतींचे घर फोडत आहेत, अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. या अगोदर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊत यांनी भांडण लावले. राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांची गाडी जाळली व तोडफोड केली. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक भाषणात आमच्या घरात आग लावण्याचे काम होत असल्याचे सांगितले होते. तेच घर फोडणारे संजय राऊत यांची मजल आता छत्रपती घराण्यांपर्यंत पोहोचले आहे. संजय राऊत यांच्या अंगरक्षकांना काही वेळ बाजूला करा म्हणजे त्यांचा ताबा हा मराठा समाज घेईल, असे नितेश राणे यावेळी म्हणाले.
शाहू महाराज यांनी संजय राऊत यांना योग्य ठिकाणी बसवले - शाहू महाराज यांचा मला खूप आदर आहे. त्यांना संजय राऊत हे भेटायला आले होते, तेव्हा त्यांना योग्य ठिकाणी बसवले होते, अशा शब्दात राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी ग्रामपंचायत लढवावी - संजय राऊत यांना आपण किती महत्त्व दिले पाहिजे हे ठरवणे गरजेचे आहे, ज्या संजय राऊत यांनी आजपर्यंत निवडणूक लढवली नाही त्यांनी भाजप पुन्हा निवडून येणार नाही हे बोलू नये, त्यांनी किमान ग्रामपंचायतची निवडणूक तरी लढवावी अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी कागलमध्ये झालेल्या सभेत भाजप यापुढे कधीही निवडून येणार नाही असे म्हणाले होते.