ETV Bharat / city

Kolhapur By Election : सतेज पाटलांचा भाजपाला टोला; म्हणाले, लोक 'त्या' प्लॅस्टिकच्या डब्यांमधूनच... - satej patil criticises bjp

विरोधकांकडून आता डबे वाटले जात आहेत, असे समजले. मात्र, काही काळजी करण्याचे कारण नाही. इथली लोकं त्याच वाटलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांमधून त्यांना परत पाठविल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला सतेज पाटील यांनी भाजपाला लगावला ( Satej Patil On Bjp ) आहे.

Satej Patil
Satej Patil
author img

By

Published : Mar 20, 2022, 10:28 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा ( Kolhapur By Election ) मतदारसंघासाठी सध्या पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे. विरोधकांकडून आता डबे वाटले जात आहेत, असे समजले. मात्र, काही काळजी करण्याचे कारण नाही. इथली लोकं त्याच वाटलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांमधून त्यांना परत पाठविल्याशिवाय राहणार नाहीत, असे पाटील यांनी म्हटलं ( Satej Patil On Bjp ) आहे.

स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, ज्या माणसाने अनेकांना आधार देण्याचे काम केले होते. त्या चंद्रकांत जाधव यांच्या जाण्याने माझ्यासारख्या अध्यात्मिक माणसाला सुद्धा देव आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडी मेळाव्यात बोलताना सतेज पाटील

भाजपाने निवडणूक लादली

मी स्वतः भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विनंती केली होती. मात्र, दुर्दैवाने पुढे यासाठी काही झाले नाही. त्यांच्या मनात काय होते माहिती नाही. शिवाय जयश्री जाधव यांनी सुद्धा बहीण म्हणून आपण सहकार्य करा, अशी विनंती केली होती. फक्त राहिलेल्या अडीच वर्षासाठी ही निवडणूक भाजपाने कोल्हापूरवासीयांवर का लादली माहिती नाही, असेही पाटील म्हणाले आहे.

पूर्ण ताकदीने आपण....

या शहरातील लोकं वेगळी आहेत. देशात काय सुरू आहे त्याचा परिणाम इथे नाही. त्यामुळे विरोधकांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या या काळात पूर्ण ताकदीने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित उतरू आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय चंद्रकांता जाधव यांना श्रद्धांजली वाहू, असेही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Reaction On MIM Praposal : एमआयएमबाबतच्या युतीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.