ETV Bharat / city

Bharati Pawar Angry In Kolhapur : ...आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोल्हापुरात अधिकाऱ्यांवर भडकल्या

कोल्हापुरात जिल्हा शल्यचिकित्सक ( Kolhapur Civil Surgeon ), मेडिकल कॉलेजचे डीन ( Kolhapur Medical Collage Dean ) आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये ( Kolhapur District Health Officer ) समन्वय नसल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार या त्यांच्यावर चांगल्याच चिडल्या ( Bharati Pawar Angry In Kolhapur ) होत्या. शासकीय विश्रामगृहात ( Kolhapur Government Rest House ) झालेल्या बैठकीत पवार यांनी या तीनही अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

भारती पवार
भारती पवार
author img

By

Published : Dec 26, 2021, 3:46 PM IST

Updated : Dec 26, 2021, 5:01 PM IST

कोल्हापूर : कोरोना काळात रुग्णांची झालेली हेळसांड ही अत्यंत गंभीर बाब आहे. असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ( Bharati Pawar Angry In Kolhapur ) यांनी कोल्हापुरात आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले. जिल्हा शल्यचिकित्सक ( Kolhapur Civil Surgeon ) यांच्याकडून आलेल्या हर्षल वेदक, सीपीआर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे डीन ( Kolhapur Medical Collage ) प्रदीप दीक्षित आणि जिल्हा आरोग्य अधिकारी ( Kolhapur District Health Officer ) यांच्यात समन्वय नसल्याच्या मुद्द्यावरून या तीनही अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात ( Kolhapur Government Rest House ) झालेल्या बैठकीत मंत्री पवार यांनी खरडपट्टी काढली आहे.

आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोल्हापुरात अधिकाऱ्यांवर चिडल्या, काढली खरडपट्टी

मी सहन करणार नाही

कोरोना काळात इतर आजार असणाऱ्या रुग्णांची हेळसांड झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. याची तक्रार भाजपाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद गुरव यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली. या तक्रारीवरून अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली. रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी सहन करणार नाही अशा शब्दात भारती पवार यांनी कोल्हापूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सुनावले. केंद्राकडून येणाऱ्या निधी हा आरोग्य विभागासाठीच शंभर टक्के खर्च झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच झापले

कोरोना काळात सीपीआर हॉस्पिटलमध्ये ( CPR Hospital Kolhapur ) फक्त कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी ठेवले गेले होते. या दरम्यान कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांची मोठी हेळसांड ( Kolhapur Non Covid Patients ) झाली आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अनेक रुग्ण दगावले. यामुळे भारती पवार यांनी या तीनही अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना केल्या. तसेच कामाकडे दुर्लक्ष केल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक ( Ex MP Dhananjay Mahadik ) , भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासमोरच मंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना झापलं आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोना काळात साहित्य खरेदीत घोटाळा

राज्य सरकार जेव्हा मागणी करते त्यावेळी त्यानुसार केंद्र सरकार मदत देत असते. मात्र मदत मिळाल्यानंतर राज्य सरकारची जबाबदारी असते ते काम पूर्ण करून घेणे. मात्र जर असा भ्रष्टाचार होत असेल तर याबाबत राज्य सरकारने त्वरित दखल घेतली पाहिजे. मी सुध्दा याबाबत चौकशी करेन, असे भारती पवार यांनी सांगितले.

अंबाबाईचे घेतले दर्शन

पवार या खाजगी कार्यक्रमासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सुरुवातीला त्यांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले आणि देशावरील कोरोनाचं संकट दूर होवो अशी अंबाबाई चरणी प्रार्थना केली. यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाच स्वागत केले. तर दुसऱ्याबाजूला राज्यसरकारवर ताशेरे ओढले.

महाराष्ट्र राज्यात काय चालल आहे हे कळत नाही

आरोग्य विभागाच्या पेपरफुटीबद्दल ( Health Department Exam Paper Leak ) बोलत असताना केंद्रीय आरोग्य केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यात काय चालल आहे हे कळत नाही. विद्यार्थी पेपर द्यायला जातात आणि त्यांना कळतं की पेपर फुटला आणि परीक्षा रद्द झाली. याबाबतचे अनेक फोन मला येऊन गेले. ज्या कंपन्याना ब्लॅक लिस्ट केले आहे त्यांनाच पेपर घेण्याचे कंत्राट दिले जात आहे. राज्य सरकार कोणत्याही गोष्टीमध्ये गंभीर दिसत नाही. मग तो एसटीचा विषय असू देत नाहीतर शेतकऱ्यांचा. एक ही काम सरकार करत नाही आणि जनता याबद्दल सरकारला जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही. एक चूक एकदा मान्य होते. पण एकच चूक वारंवार होत असेल तर, काय म्हणावं असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका ( Bharati Pawar Criticized MVA Government ) केली.

पंतप्रधान यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी काल रात्री तीन मोठी घोषणा केल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांना आता कोरोना प्रतिबंध लस दिली जाणार आहे. तसेच आरोग्य सेवक आणि वृद्ध नागरिकांसाठी आता बूस्टर डोस दिला जाणार याबाबत आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो असे भारतीय पवार म्हणाल्या.

Last Updated : Dec 26, 2021, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.