कोल्हापूर- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीस यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांना स्वतःचे खानापूर गाव राखता आले नाही, आणि ते शरद पवार, संजय राऊत यांना कशाला आव्हान देत आहेत, असा टोला त्यांनी लगाववा आहे. तसेच यापुढे आमचे नेते शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्य विधान खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ते शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघात पाटलांनी निवडणूक लढवली-
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट निश्चित होती का नाही, हे माहिती नाही. त्यांची बैठक कशाबद्दल झाली याबाबत आपल्याला कल्पना नाही. मात्र प्रसारमाध्यमांसमोर चंद्रकांत पाटील यांनी आमचे नेते शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले. त्याचा मी निषेध करतो. ज्यांना कोल्हापुरातून विधानसभेसाठी जागा मिळाली नाही. त्यांनी एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवली, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. त्यामुळे येत्या काळात शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले तर सहन करणार नाही, असा इशारा देखील मुश्रीफ यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव असलेले खानापूर हे त्यांना राखता आले नाही. मग खासदार संजय राऊत यांना का आव्हान देता? असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला आहे. कोरोना प्रतिबंधचे दोन डोस घेणाऱ्या संदर्भात लोकल प्रवास व इतर सुविधांसाठी निर्णय घेतला जाईल, मात्र या निर्णयाअगोदर विरोधक श्रेय वादासाठी प्रयत्न करत आहेत, असा टोला देखील त्यांनी नाव न घेता आमदार निलेश राणे यांना लगावला.
संजय राऊत यांनी निवडून येऊन दाखवावे, म्हणाले होते पाटील-
द्रकांत पाटलांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि महाराष्ट्र निर्माण सेना यांच्या संभाव्य युतीबाबत टीका केली. याबाबत बोलताना पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला होता. 'एकदा संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडणूक लढून जिंकून येवून दाखवावे. त्यांनी त्यांचे दंडही थोपटून पहावे आणि ताकदही पहावी', असे पाटील म्हणाले होते पाटील.