कोल्हापूर - गेल्या चौदा दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्यांमध्ये बदल करा अशी शेतकरी मागणी करत आहेत. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यायला तयार नाही. वरून भाजपचे रावसाहेब दानवे यांनी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल चुकीचे वक्तव्य केले. अशा लोकांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भुईसपाट केले पाहिजे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. विधानपरिषदेचे पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड आणि जयंत असगावकर यांच्या सत्कार समारंभाचे कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होते. यावेळी मुश्रीफ बोलत होते.
आशा लोकांना भुईसपाटच केले पाहिजे; मुश्रीफ यांचा भाजपवर हल्लाबोल - हसन मुश्रीफ यांच्या बद्दल बातमी
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. खरी परिस्थिती येते तेंव्हा जिवाभावाचे लोक लागतात. ती कमवायची असतील तर लोकांमध्ये जाऊन काम करावे लागते असेही ते म्हणाले.
![आशा लोकांना भुईसपाटच केले पाहिजे; मुश्रीफ यांचा भाजपवर हल्लाबोल Minister Hasan Mushrif criticizes Chandrakant Patil](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9846583-438-9846583-1607697759788.jpg?imwidth=3840)