कोल्हापूर - नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2021 ) ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ( Senior Journalist Girish Kuber ) यांच्यावरील शाई फेकीचे ( Activists of Sambhaji Brigade Threw Ink ) मराठा क्रांती मोर्चाने समर्थन ( Maratha Kranti Morcha ) केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील ( Coordinator Dilip Patil ) यांनी याबाबत कोल्हापुरात माहिती दिली आहे. छत्रपतींच्या घराण्याबद्दल परत असे लिखाण करू नये, हा त्या लोकांना इशारा असल्याचे म्हटले असून चुकीच्या पद्धतीने लिखाण करणाऱ्याना हा धडा आहे, असेही ते म्हणाले.
- संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचेही समर्थन
संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेक केली. काल (रविवारी) नाशिक येथे कार्यक्रमादरम्यान त्यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. शिवाय चुकीच्या पद्धतीचा इतिहास लोकांसमोर मांडू नका अन्यथा अशाच पद्धतीने नागरिकांतून संताप होईल, असे सांगण्यात आले. त्याचे मराठा क्रांती मोर्चाने सुद्धा समर्थन केले आहे. याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचेही समर्थन केले आहे.
- काय आहे प्रकरण?
काल (रविवारी) दुपारी गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण अशा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी जात असताना कुबेर यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला. या घटनेत एका पोलिसांचा गणवेश शाईने खराब झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ (Renaissance State Book) या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल अनेक राजकीय पक्षांनी तसेच विविध संघटनांनी विचारला गेला होता. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. यामुळेच शाईफेक झाली असावी, असा कयास लावला जात असून परिसरातदेखील याबाबत चर्चा आहे.
हेही वाचा - Girish Kuber Ink Thrown Incident : गिरीश कुबेर यांच्यावरील शाई हल्ला निंदनीय - शरद पवार
हेही वाचा - Sahitya Sammelan 2021 : संभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक