ETV Bharat / city

Maratha Community Protest in Kolhapur : कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलन

author img

By

Published : Feb 28, 2022, 3:41 PM IST

Updated : Feb 28, 2022, 5:12 PM IST

कोल्हापुरातील दसरा चौकात हजारो मराठा कार्यकर्ते एकत्र येत रास्ता रोको आंदोलन (Maratha Activist Protest in Kolhapur) केले आहे. तसेच मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास कोल्हापूर बंदचा इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईमध्ये संभाजीराजेंचे उपोषण (Sambhajiraje Chhatrapati Agitation) सुरू आहे.

Maratha Community Protest
मराठा समाजाचे कोल्हापुरात आंदोलन

कोल्हापूर - मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध प्रलंबित मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati Agitation) हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. तर दुसरीकडे संभाजीराजेंची प्रकृतीही ढासळत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील मराठा समाज आता आक्रमक झाला आहे.

कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन -

आंदोलनाचा प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

कोल्हापुरातील दसरा चौकात हजारो मराठा कार्यकर्ते एकत्र येत रास्ता रोको आंदोलन (Maratha Activist Protest in Kolhapur) केले आहे. तसेच मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास कोल्हापूर बंदचा इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईमध्ये संभाजीराजेंचे उपोषण सुरू आहे. मात्र, ज्यांना मुंबईला जाणे शक्‍य नाही अशांनी कोल्हापुरातील दसरा चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

सर्व पक्ष संघटना एकत्र:

आमदार विनय कोरे

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या उपोषणास आता अनेक पक्षांचा आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आज झालेल्या आंदोलनात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह चेंबर्स ऑफ कॉमर्स, रिक्षा संघटना सहभागी झाले होते. यावेळी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, एखाद्या राजाला स्वराज्यात आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर सामान्य माणूस काय करणार. मराठा समाजावर झालेल्या अन्यायामुळे आत्मक्लेश करण्यासाठी संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. यातून मराठा समाजाच्या भावना दिसत आहेत. त्यांनी केलेल्या मागण्या या योग्यच आहेत. त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच राज्य शासनाच्या अंतर्गत असणारे निर्णय लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी विधीमंडळात पाठपुरावा करू, असा शब्दही कोरे यांनी दिला आहे.

Last Updated : Feb 28, 2022, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.