कोल्हापूर - मराठा आरक्षणासंदर्भात आज कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावरून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मात्र, आज सकाळपासून कोल्हापुरात पावसाला सुरुवात झाली आहे. अशा पडत्या पावसात मराठा समाजाचे हे आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलनस्थळी राज्यभरातील मराठा आंदोलनाचे समन्वयक संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आदोलन करत आहेत.
या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडावी हा उद्देश आहे. त्यानुसार आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील लोक्रप्रतिनिधींनी या आंदोलनस्थळी उपस्थिती लावली आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील संवाद सांधला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यात पावसानेही हजेरी लावली आहे. त्याचे ईटीव्ही भारतने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने घेतलेले दृश्य