ETV Bharat / city

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास घरफळ्याच्या 20 टक्के दंड; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय - कोरोना नियमांचे उल्लघन केल्यास दंड

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास घरफळ्याच्या 20 टक्के दंड आकरण्यात येणार आहे. या बाबत निर्णय माणगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Mangaon Gram Panchayat has decided to impose a penalty of 20% of house tax for violating lockdown rules
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास घरफळ्याच्या 20 टक्के दंड; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय
author img

By

Published : May 19, 2021, 4:53 PM IST

कोल्हापूर - लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट घरफाळ्याच्या 20 टक्के इतका दंड वसूल केला जात आहे. कोल्हापूरातल्या माणगाव ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला असून त्याद्वारे 11 हजारांचा दंडही घरफाळ्यामध्ये जमा करण्यात आला आहे. गावचे सरपंच राजू मगदूम आणि उपसरपंच अख्तर भालदार यांच्यासह सर्वच सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला असून माणगाव ग्रामपंचायतीच्या या अनोख्या उपक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास घरफळ्याच्या 20 टक्के दंड; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय

नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 50 सामाजिक कार्यकर्त्यांची फौज -

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने 23 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केला आहे. हातकणंगले तालुक्यातल्या माणगाव ग्रामपंचायतीने मात्र यामध्ये वाढ करून तो 24 मे रात्री 12 पर्यंत केला आहे. सध्या या गावात 14 ते 15 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि कोरोना दक्षता समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर घरफाळ्याच्या 20 टक्के दंड जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील 50 सामाजिक कार्यकर्त्यांची फौजसुद्धा तैनात केली असून गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. आत्तापर्यंत 24 जणांवर अशी कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 हजार 504 रुपये जमा झाले आहेत, असे गावचे सरपंच राजू मगदूम यांनी म्हटले आहे.

Mangaon Gram Panchayat has decided to impose a penalty of 20% of house tax for violating lockdown rules
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास घरफळ्याच्या 20 टक्के दंड; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय

कारवाई सुरू केल्यानंतर गावात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण नाही -

4 दिवसांपासून गावात सुरू असलेल्या अनोख्या कारवाईमुळे नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे फोटो, व्हिडिओसुद्धा काढले जात आहेत. त्यामुळे कट्ट्यावर बसणाऱ्यांसह नियम मोडणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे. विशेष म्हणजे या कडक कारवाईमुळे गावात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचेही समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.