कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर अज्ञात व्यक्तीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. याआधी शुक्रवारी कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये शिवसेनेच्या वाहनांवर हल्ला केला. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दगडफेकीची घटना घडल्याचे बोलले जात आहे.
दगडफेकीनंतर दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांच्या बेळगावातील हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी शुक्रवारी कर्नाटकची बस रोखली होती. आता कोल्हापुरातील बस स्थानकावर एसटी बसवर दगडफेक झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची स्थिती यामुळे निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...