ETV Bharat / city

Landslide in Shahuwadi Taluka शाहूवाडी तालुक्यात भूस्स्खलन, नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरसुद्धा केर्ली येथे पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, आज पाणीपातळी कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीलासुद्धा पूर आला असून, भडगाव हिरण्यकेशी पुलावर दोन फूट पाणी आले आहे. त्यामुळे गडहिंग्लज चंदगड राज्य मार्ग बंद आहे. शिवाय शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन येथील धावडा खिंड येथे पहाटे भूस्स्खलन झाले असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Water Level of Panchganga 5 Gates of Radhanagari Dam Opened

Nrisimhwadi Dutt Temple Under Water
नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली
author img

By

Published : Aug 12, 2022, 3:51 PM IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळपासून स्थिर आहे. एकीकडे पावसाचा जोर कमी झाला असला, तरी सद्य:स्थितीत पंचगंगा नदीने इशारा ( Water Level of Panchganga ) पातळी ओलांडली असून, ती आता धोका पातळीकडे वाटचाल करीत आहे. सध्याची पाणी पातळी 41.7 फुटांवर आहे. राधानगरी धरणाची 5 दरवाजे उघडले ( 5 Gates of Radhanagari Dam Opened ) असून, त्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. दरम्यान, येथील कृष्णा नदीलासुद्धा पूरस्थिती निर्माण झाली असून, येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

राधानगरी धरणाची 5 दरवाजे उघडले

करंजफेन येथील धावडा खिंड येथे पहाटे भूस्सखलन : दरम्यान, येथील कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरसुद्धा केर्ली येथे पाणी आले असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, आज पाणीपातळी कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीलासुद्धा पूर आला असून, भडगाव हिरण्यकेशी पुलावर दोन फूट पाणी आले आहे. त्यामुळे गडहिंग्लज चंदगड राज्य मार्ग बंद आहे. शिवाय शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन येथील धावडा खिंड येथे पहाटे भूस्स्खलन झाले असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Landslide in Shahuwadi Taluka
शाहूवाडी तालुक्यात भूस्स्खलन

राधानगरी धरणातून मोठा विसर्ग; परिसरात अद्यापि मुसळधार : सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 41.7 फुटांवर आहे. पंचगंगेची इशारा पातळी 43 फूट आहे. मात्र, सकाळपासून पाणीपातळी 1 इंचाने कमी झाले आहे. तूर्तास कोल्हापुरात पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी म्हटले आहे. सध्या राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. 3, 4, 5, 6 आणि 7 नंबरचे दरवाजे उघडले असून, त्या पाच दरवाज्यांतून आणि पाॅवर हाऊसमधून 1 हजार 600 क्युसेक असा एकूण 8 हजार क्युसेक आसपास विसर्ग सुरू आहे.

Landslide in Shahuwadi Taluka
शाहूवाडी तालुक्यात भूस्स्खलन

अलमट्टी धरणातून सव्वा 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळीच्या उंबरठ्यावर आहे. राधानगरी धरणाचेसुद्धा 5 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे दूधगंगा नदीत 8 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जेव्हा जेव्हा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होत असते, तेव्हा कर्नाटकमध्ये असलेल्या महाकाय अलमट्टी धरणातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करावा लागतो. आजसुद्धा जिल्ह्यात महापुराचा धोका वाढला असल्याने अलमट्टी धरणातून तब्बल सव्वा 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. आज सकाळपासून हा विसर्ग 25 हजार क्युसेकने वाढवला आहे.

हेही वाचा Gram Panchayat Elections ग्रामपंचायत निवडणुकांची मत मोजणी सुरु 5 हजार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.