ETV Bharat / city

Shahu Maharaj Jayanti Kolhapur : लक्ष्मी विलास पॅलेस वास्तू संग्राहालय सर्व सामान्यांसाठी खुले - लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर

वास्तू संग्रहालयाला भेट देणारा राजर्षी शाहू महाराजांच्या ( Rajarshi Shahu Maharaj ) सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील ( Guardian Minister Satej Patil ) यांनी व्यक्त केला आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेतस सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

वास्तू संग्राहालय उद्घाटन
वास्तू संग्राहालय उद्घाटन
author img

By

Published : Jun 26, 2022, 4:50 PM IST

Updated : Jun 26, 2022, 5:02 PM IST

कोल्हापूर - लक्ष्मी विलास पॅलेस हे राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले वास्तू संग्रहालय आजपासून ( रविवार ) लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येत आहे. या संग्राहलयास भेट देणारी प्रत्येक व्यक्ती राजर्षी शाहू महाराजांच्या ( Rajarshi Shahu Maharaj ) सामाजिक न्यायाच्या विचारांची स्फूर्ती घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील ( Guardian Minister Satej Patil ) यांनी व्यक्त केला आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंती निमित्त येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेतस सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

प्रतिक्रिया देताना मंत्री

'राजर्षी शाहू महाराजांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे' : महाराजांचा समतेचा विचार लोकांसमोर जावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. शाहू राजांचा समतेचा आणि सर्वधर्म समभाव हा विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी स्मृती शताब्दी वर्षात वर्षात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असून हे विचार भावी पिढीला प्रेरणा देणारे आहेत. वास्तू संग्रहालयाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे विचार, कार्य आणि इतिहास नव्या पिढीसमोर नक्कीच जाईल. या वास्तु संग्राहलयाच्या पुढच्या टप्प्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

'शाहू राजांचे समाजाभिमुख काम प्रेरणा देणार' : राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले परिर्वतन व समतेसाठी केलेले काम हिमालयासारखे आहे. सामान्यांच्या हितासाठी स्वत:चा खजिना रिकामा करणाऱ्या राजाने समतेचा कामाचा पाया रचला. गोरगरीब, सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी असून त्यांनी घेतलेल्या समाजाभिमुख निर्णयाचा वसा पुढे नेण्याचे काम राज्य शासनमार्फत होत असल्याची भावनाही मुश्रीफांनी बोलून दाखविली आहे.

हेही वाचा - Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj : समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून राधानगरी धरणावर राजर्षी शाहू जयंती

Last Updated : Jun 26, 2022, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.