कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून (दि. 1 ऑगस्ट) पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आज 1 ऑगस्ट पासून ही विमानसेवा सुरू झाली आहे. कोल्हापूर ते तिरुपती असा 45 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर, तिरुपतीहुन कोल्हापूरला केवळ 8 प्रवाशांनी प्रवास केला. कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू झाल्यापासून याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आज तब्बल 3 महिन्यांनंतर विमानसेवा सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी एकूण 53 प्रवाशांनी प्रवास केला आहे.
विमानसेवा पूर्ववत
कोल्हापूर तिरुपती विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस असणार आहे. या चारही दिवशी आता नियमितपणे विमानसेवा सुरू राहणार असून, दररोज दुपारी बारा वाजता कोल्हापुरातून तिरुपतीला विमान उड्डान घेणार आहे. इंडिगो एअर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू असून, प्रवाशांनीसुद्धा या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विमानतळ प्राधिकरणचे संचालक कमल कुमार कटारिया यांनी केले आहे.