ETV Bharat / city

सहा वेळा दंड झाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले अन् समोर आले 'हे' वास्तव!

शाहूपुरी पोलीस शोध घेत अॅक्सेस दुचाकीस्वार अनिल कस्तुरे यांच्यापर्यंत पोहोचले. कस्तुरे याने त्याच्या नातेवाईकाच्या नावे असलेली दुचाकी आरटीओ पासिंग केली नाही. टॅक्स, विमा रक्कम भरणा करावयास लागू नये, पोलीस यंत्रणा, आरटीओ, फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या कारवाईला टांग मारता यावी, यासाठी दुचाकीला (एमएच ११ सीसी ८८८७) अशा बनावट क्रमांकाची नंबर प्लेट लावून तो शहरात मिरवत होता.वाहतूक विभागाचे हवालदार सुरेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल कस्तुरे याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावटी कागदपत्रे करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

kolhapur police arrested dumy number plate bike owner
सहा वेळा दंड झाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले अन् समोर आले 'हे' वास्तव!
author img

By

Published : Oct 11, 2020, 9:00 PM IST

सातारा - वाहतुकीचे सर्व नियम काटेकोर पाळत असताना वारंवार वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला त्यांना सामोरे जावे लागत होते. या प्रकारामुळे चक्रावून गेलेल्या वाहनधारकाने पोलिसांत धाव घेतली अन् अखेर त्या भामट्याच्या काॅलरपर्यंत जाण्यात पोलिसांना यश आले. अनिल महालिंग कस्तुरे (वय ३९ रा करंजे, सातारा) असे त्या भामट्याचे नाव असून त्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली.

सहा वेळा दंड झाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले अन् समोर आले 'हे' वास्तव
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कुमठे (ता. कोरेगाव) येथील श्रीधर रामदास जगदाळे य‍ांच्याकडे हिरो होंडा मोटारसायकल (एमएच ११ सीसी ८८८७) आहे. त्यांना वारंवार ऑनलाइन दंड जात होता. आपण वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करत असताना पोलिसांचा वारंवार ऑनलाईन दंड का होतोय, याचा त्यांना संशय आला. जगदाळे यांना सहा वेळा असा दंड झाला होता. जगदाळे यांनी पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. शाहूपुरी पोलीस शोध घेत अॅक्सेस दुचाकीस्वार अनिल कस्तुरे यांच्यापर्यंत पोहोचले. कस्तुरे याने त्याच्या नातेवाईकाच्या नावे असलेली दुचाकी आरटीओ पासिंग केली नाही. टॅक्स, विमा रक्कम भरणा करावयास लागू नये, पोलीस यंत्रणा, आरटीओ, फायनान्स कंपनीकडून होणाऱया कारवाईला टांग मारता यावी, यासाठी दुचाकीला (एमएच ११ सीसी ८८८७) अशा बनावट क्रमांकाची नंबर प्लेट लावून तो शहरात मिरवत होता.वाहतूक विभागाचे हवालदार सुरेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनिल कस्तुरे याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावटी कागदपत्रे करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.