ETV Bharat / city

ऑक्सिजन उत्पादक कंपन्या अधिगृहित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - kolhapur oxygen production company news

कोल्हापूर ऑक्सिजन कागल, के नायट्रोजन प्रा लि-शिरोली, महालक्ष्मी गॅसेस यड्राव इचलकरंजी, देवी इंडस्ट्रीयल गॅस गोकूळ शिरगाव आणि चंद्रा उद्योग शिरोली, अशा पाच ऑक्सिजन उत्पादक कंपन्या आहेत. या पाचही कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी आज दिले असून, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचनाही दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

 kolhapur collector daulat desai order to undertake oxygen production company for corona pandemic duty

author img

By

Published : Aug 19, 2020, 4:32 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्या आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यान्वये अधिग्रहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. जिल्ह्यात ज्या पाच कंपन्या ऑक्सिजन उत्पादन करतात त्या पाचही कंपन्यांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करावयाचा असून, अन्य कारणासाठी तसेच इतर जिल्ह्यात पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांची परवानगी घ्यायच्या सूचना देण्यात आल्या आहे.

परवानगी न घेतल्यास अशा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला आहे. याबाबत कंपन्यांच्या ठिकाणी कर्मचारी नियुक्तीच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

कोल्हापूर ऑक्सिजन कागल, के नायट्रोजन प्रा लि-शिरोली, महालक्ष्मी गॅसेस यड्राव इचलकरंजी, देवी इंडस्ट्रीयल गॅस गोकूळ शिरगाव आणि चंद्रा उद्योग शिरोली, अशा पाच ऑक्सिजन उत्पादक कंपन्या आहेत. या पाचही कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी आज दिले असून, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचनाही दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचा पुरवठा या कंपन्यांकडून होतोय का, याची पाहणी हे कर्मचारी करणार आहेत. यासाठी या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील तसेच अन्य उद्योगांसाठी पुरवठा करण्याची परवानगी प्रादेशिक अधिकारी इंगळे यांच्याकडून घ्यावी लागेल अन्यथा अशा कंपन्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या कंपन्यांवर याबाबतचे आदेश बजावण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.