ETV Bharat / city

Kolhapur By Election : 'चंद्रकांत पाटील काय बोलतात हे बघायचं लोक...'; राजेश क्षीरसागरांचा टोला - kolhapur by election marathi news

चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिक नाराज असून, मतांच्या माध्यमातून ती नाराजी दिसेल, असे म्हटले होते. लोक चंद्रकांत पाटील काय बोलतात हे बघायचेचे बंद करतील, असा टोला राजेश क्षीरसागर यांनी लगावला ( Rajesh Kshirsagar On Chandrakant Patil ) आहे.

Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar
author img

By

Published : Mar 23, 2022, 9:28 PM IST

कोल्हापूर - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp Leader Chandrakant Patil ) यांनी शिवसैनिक नाराज असून, मतांच्या माध्यमातून ती नाराजी दिसेल, असे वक्तव्य केले होते. त्याला आता शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर ( Shivsena Leader Rajesh Kshirsagar ) यांनी उत्तर दिले आहे. लोकांमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा चंद्रकांत पाटील प्रयत्न करतात. आता लोक चंद्रकांत पाटील काय बोलतात हे बघायचेचे बंद करतील, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला ( Rajesh Kshirsagar On Chandrakant Patil ) आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Kolhapur By Election ) जयश्री जाधव यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. क्षीरसागर यांनी स्वतः याठिकाणी पक्षाच्या आदेशानुसार अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. त्यानंतर क्षीरसागर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

26 मार्च रोजी पुन्हा शिवसेनेचा मेळावा

राजेश क्षीरसागर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच नाराजी आहे. मात्र, सर्व शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश मानणारे आहेत. ज्यानुसार जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभारणार आहोत. शिवाय येत्या 26 मार्च रोजी शिवसेनेचा मोठा मेळावा घेत सर्वच शिवसैनिकांना आवाहन करणार आहोत, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे. शिवाय चंद्रकांत पाटील जे म्हणतात त्याच्या विरोधातील चित्र इथे पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

राजेश क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, जयश्री जाधव प्रसारमाध्यमांशी बोलताना

चंद्रकांत पाटील यांचा दावा कधीही...

चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, ते आजपर्यंत अनेकवेळा दावे करत आले आहेत. त्यामुळे अनेक दाव्यांप्रमाणे त्यांचा कोल्हापूर उत्तर बाबत सुद्धा दावा आहे. तो कधीही खरा होणार नाही. कोल्हापूरातील स्वाभिमानी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर चालणारी जनता त्यांना या निवडणुकीत चांगले उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवाय महाविकास आघाडी भक्कम असून त्याचा येणाऱ्या निकाला दिवशी प्रत्यय येईल असेही, बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं.

जनता 12 तारखेलाच उत्तरचं उत्तर....

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यावेळी बोलताना म्हणाल्या की, आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येणाऱ्या 12 एप्रिल रोजी निकालातून जनता आपल्याला उत्तरचं उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Devendra Fadnavis On ED Inquiry : केंद्रीय तपास यंत्रणा कधीही चुकीची कारवाई करणार नाही - देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.