ETV Bharat / city

किराणा, औषध दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 चालू ठेवा : दैलत देसाई

काही नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या ठिकाणी तीन -चार दिवस लॉकडाऊन करणे आणि पुन्हा सुरु करणे असे सुरु आहे. यामुळे गर्दी होत आहे. यासाठीच भाजीपाला आणि विक्रेद्रीकरण आणि किराणा औषध दुकाने सकाळी ९ ते रात्री९ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जील्हाधीकाऱ्यांनी दिले आहेत.

kirana and medicine shopes open at morning 9 am to night 9 pm in kolhapur says collector
किराणा, औषध दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 चालू ठेवा : दैलत देसाई
author img

By

Published : Apr 2, 2020, 11:47 PM IST

कोल्हापूर - काही नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींच्या ठिकाणी तीन-चार दिवस लॉकडाऊन करणे आणि पुन्हा सुरू करणे असे सुरू आहे. यानंतर जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करावे तसेच किराणा आणि औषध दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 सुरू ठेवावीत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या संचारबंदीच्या काळात नागरिक स्वत:च स्वयंसेवक झाले आहेत. होम क्वारंटाईनबाबत लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होत आहे.

कोल्हापूर महापालिकेच्यावतीने शहरामध्ये भाजीपाला विक्रीचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा योग्यरितीने होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका तसेच लोकवस्ती जास्त असणाऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने विकेंद्रीकरण करावे जेणेकरून नागरिकांना लांब जावे लागणार नाही. जवळच्या जवळ वस्तू उपलब्ध होतील आणि गर्दीही टाळता येईल, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.