कोल्हापूर - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दिलेले मोबाईल परत घेऊन कामकाज करण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरू आहे. अनेक सेविकांना कारवाई करण्याच्या धमक्याही दिल्या जातात. हे सर्व तात्काळ थांबावे यासाठी आज (शुक्रवार) कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला.
हे ही वाचा - हसन मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू - सतेज पाटील
3) अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मूळ काम लाभार्थ्यांना सेवा देणे आहे. त्यांची पूर्तता झाल्यावर केवळ मोबाईल ॲप मध्ये माहिती पाठविण्यात कमी पडल्यामुळे मानधन अथवा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात कपात करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे मानधन अथवा आहार कोणत्याही अॅपला जोडू नये व मानधन व पोषण आहारात कोणत्याही प्रकारची कपात करू नये.
4) मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा 500 व 250 प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. त्यात सुधारणा व्हावी आणि त्याच्या किमान 1 हजार ते 2 हजार अशी वाढ करा.
5) मोबाईलवर काम वाढल्यापासून सेविकांची पदे रिक्त असलेल्या अंगणवाडीची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणे सेविकांना अशक्य आहे. त्यामुळे रिक्त जागांवर ताबडतोब भरती करावी.
6) शासनामार्फत युनिफॉर्मचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. ते तात्काळ मिळावे.
7) ज्या सेविकांचे कोरोना काळात निधन झाले. त्यांना अद्याप शासनाकडून कोणतीही प्रकारची मदत मिळालेली नाही, ती तात्काळ मिळावी.