ETV Bharat / city

हिंमत असेल तर राज्य सरकारला जाब विचारा, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टी यांना टोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

आज जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन करत आहेत. ते राज्य सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. जर हिम्मत असेल तर सरकारमधून बाहेर पडून जाब विचारावा, असा टोला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लगावला आहे.

sadabhau-khot
sadabhau-khot
author img

By

Published : Sep 26, 2021, 4:29 PM IST

Updated : Sep 26, 2021, 4:50 PM IST

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी एफआरपीचे तुकडे करण्यासंदर्भात शिफारस कोणी दाखल केली? याचा जाब राज्य सरकारला विचारावा. आज जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन करत आहेत. ते राज्य सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. जर हिम्मत असेल तर सरकारमधून बाहेर पडून जाब विचारावा, असा टोला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लगावला आहे. येत्या 5 ऑक्टोंबर रोजी सोलापुरात जागर एफआरपीचा आणि एल्गार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, हा मोर्चा काढणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, उसाला दर मिळावा यासाठी तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर आणि कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात दोन शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. मग आता तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा प्रस्ताव राज्याचे सहकार खाते केंद्राला शिफारस करत असेल तर सहकारमंत्र्यांच्या दारात आंदोलनाला कधी बसणार? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना केला आहे.

..ही डबल ढोलकी वाजवायचं बंद करा -

एका बाजूला सरकारमध्ये राहून शिफारशीला मूकसंमती द्यायची आणि दुसरीकडे त्याच प्रश्नासंदर्भात आंदोलन करायचे. ही डबल ढोलकी वाजवायचं बंद करा. जर एफआरपीचे तीन तुकडे करण्याच्या शिफारशीला तुमचा पाठिंबा नसेल तर सरकारमधून बाहेर पडा. राज्य सरकारने ही शिफारस करण्याचा निर्णय घेतला मग केंद्राकडे बोट का दाखवता? असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

हे ही वाचा - अजित पवार आमचेही ऐकत जा, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत - संजय राऊत

केंद्र सरकारने यापूर्वीच ठरवले आहे की, एफआरपीचे तुकडे करायचे नाहीत. राज्य सरकारच्या या निर्णयावर कोणतीच भूमिका घेणार नाही. आम्ही ठामपणे सांगतो की एफआरपीचे तुकडे होणार नाहीत. मात्र याचे श्रेय घेण्यासाठी एका नेत्याची धडपड सुरू आहे. याचा डांगोरा पिटला जाईल, असा टोला देखील सदाभाऊ खोत यांनी लगावला.

सोलापुरात 'जागर एफआरपी चा आणि एल्गार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा' मोर्चा -

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारच्या विरोधात 5 ऑक्टोंबर रोजी सोलापुरात जागर एफआरपी चा आणि एल्गार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोर्चा काढणार आहे. जर राज्य सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटना अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला.

Last Updated : Sep 26, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.