कोल्हापूर - केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे लागू करण्यास राज्य सरकारने स्थगिती दिली असून भाजपाच्या किसान मोर्चाच्यावतीने आज त्यासंदर्भातील आदेशाची होळी करण्यात आली. .
कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपाने या आदेशाची होळी केली. तसेच हा कायदा महाराष्ट्रात लागू होण्यासाठी भाजप पुढेही आंदोलन करेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
किसान मोर्चाचे नेते भगवान काटे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी हिताचा कायदा केला असताना, काँग्रेस व डावी आघाडी याला विरोध करत आहे. या आधी काँग्रेस हा कायदा आणणार होती. मात्र सध्या भाजपाने कायदा आणला म्हणून विरोध सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने या कायद्याला स्थगिती दिली. मात्र ती देता येत नाही. त्यासाठी आंदोलनाचा लढा सूर ठेवणार असल्याचे काटे यांनी सांगितले.