कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मुंबई सातारा नंतर कोल्हापूरात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्या प्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज ( मंगळवारी ) गुणरत्न सदावर्ते यांच्या अटक पूर्ण जामीनासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. मात्र ही सुनावणी पोलिसांकडून अद्याप कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली आहे. यामुळे आता ही सुनावणी 21 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
अटकपूर्व जामीन अर्ज लांबणीवर : सरकारी पक्षाला पोलिसांकडून अद्याप कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या अटक पूर्व जामीन अर्जाची सुनावणी आज पुढे ढकलण्यात आली आहे. प्रथम वर्ग जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्या सामोर सुनावणी पार पडली असून सदावर्ते यांना अटक होण्यापासून वाचवण्यासाठी ही सुनावणी घेण्यात आली. मात्र कागदपत्र नसल्याने ही सुनावणी आता 21 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यासाठी शाहुपुरी पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक मुंबईसाठी रवाना झाले आहे. यामुळेच आता सदावर्ते यांना कोल्हापूर पोलीस कधीही अटक करू शकतात याची दाट शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?: खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचारी केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणि छत्रपतींच्या वारसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. अशातच त्यांच्या अडचणीत अजून वाढ झाली असून दोन समाजात तेढ निर्माण होईल तसेच एकोप्याला बाधा येईल, अशी कृती केल्या प्रकरणी मुंबई सातारा नंतर कोल्हापुरातही त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात लेखी तक्रार नोंद केली होती. त्यानुसार त्यांच्या विरोधात कलम 153 (अ) नुसार गुन्हा नोंद आहे.
हेही वाचा - Leopard Hunts Dog : अंधारात बिबट्याने कुत्र्याची 'अशी' केली शिकार, पहा व्हिडिओ