ETV Bharat / city

Bandatatya Karadkar Controversy : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कधीही मद्याच्या थेंबाला हात लावला नाही - हसन मुश्रीफ

राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्याविरुद्ध ( Controversial statement of Bandatatya Karadkar ) राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही ( Hasan Mushrif on Bandatatya Karadkar statement ) मत व्यक्त केले आहे

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Feb 4, 2022, 3:18 PM IST

Updated : Feb 4, 2022, 3:41 PM IST

कोल्हापूर- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी कधीही मद्याच्या थेंबाला हातही लावला नाही. पवार घराण्याची बदनामी करण्याच्या प्रयत्नाला बंडातात्या कराडकर यांनी बळी पडू नये, अशी अपेक्षा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif on Ajit Pawars addiction ) यांनी केली. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्याविरुद्ध ( Controversial statement of Bandatatya Karadkar ) राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही ( Hasan Mushrif on Bandatatya Karadkar statement ) मत व्यक्त केले आहे

महाविकास आघाडी सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात ( protest against Bandatatya Karadkar in MH ) आंदोलन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले. त्या वादग्रस्त विधानाविरोधात राज्यभर पडसाद उमटत आहेत.

संपूर्ण पवार कुटुंबीय हे निर्व्यसनी

हेही वाचा-Amruta Fadanvis : स्त्रीयांच्या खाजगी आयुष्यावर टिपणी करणे योग्य नाही - अमृता फडणवीस

संपूर्ण पवार कुटुंबीय हे निर्व्यसनी
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते याबद्दल यांना विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, बंडातात्या कराडकर यांच्याबद्दल आम्हाला अभिमान होता. ते समाजाला एक दिशा देणारे कीर्तनकार आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या विधानामुळे मला दुःख झालेले आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या आयुष्यात कधीही मद्याच्या थेंबालासुद्धा हात लावलेला नाही. संपूर्ण पवार कुटुंबीय हे ( Hasan Mushrif on Pawar family ) निर्व्यसनी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पवार कुटुंबियांची किती महत्वाची भूमिका आहे, हे सर्वांना माहीत आहे. सध्या अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहभागातून सरकार उत्तम प्रकारे काम करत आहे. मात्र, काही जण पवार घराण्याची बदनामी करणाऱ्याचा प्रयत्न करत आहेत. बंडातात्या कराडकर यांनी त्या लोकांना बळी पडू नये, असा सल्लादेखील हसन मुश्रीफ यांनी बंडा तात्यांना दिला आहे.

हेही वाचा-Video : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गणेश जन्म सोहळा संपन्न

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये देणार
ग्राम विकास खात्यातर्फे महत्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे. सध्या राज्यातील ग्राम विकास खाते हे देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या टप्प्यात पाच लाख घरे बांधून दिली होती. दुसऱ्या टप्प्यातदेखील पाच लाख घरे बांधून देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. कामगार खात्यातर्फे नोंदणी करून बांधकाम कामगारांना पहिल्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये आहेर देणार असल्याचेदेखील मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Bandatatya Karadkar Controversial Statement : बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर शहराची हद्दवाढ मंत्र्यांवर अवलंबून नाही
कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेले नाही. यामुळे हद्दवाढ कृती समितीकडून आता आर या पारची लढाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही हद्दवाढ होत नाही, अशी खंत कृती समितीकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यात किती मंत्री आहेत, यावर हद्दवाढ अवलंबून नाही. लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून असल्याचे विधान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. ग्रामीण भागातील लोकांची कोल्हापूर शहरात येण्याची मानसिकता नाही. शहरातील नागरिकांना महानगरपालिकेतर्फे योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्याची ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता आहे. मानसिकता बदलेपर्यंत हद्दवाढ होऊ शकत नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात-
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात आंदोलन ( Bandatatya Karadkar Controversial Statement ) केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा नेत्या पंकडा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने आता वाद चिघळला ( Bandatatya Karadkar On Supriya Sule ) आहे. राज्यात ठिकठिकाणी बंडातात्या कराडकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कजा मुंडे आणि सुप्रिया सुळेंबद्दलही वादग्रस्त विधान

'दंडवत दंडुका' आंदोलनात बोलातना बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्या पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. पंकजा आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात, असे त्यांनी म्हटले.

Last Updated : Feb 4, 2022, 3:41 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.