कोल्हापूर - माझ्याकडे व्हाईट मनी आहे की नाही, याची चिंता चंद्रकांत पाटलांनी करू नये. गरज भासल्यास मी त्यांच्याकडून पैसे घेईन. त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते.
हे ही वाचा - माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
किरीट सोमैया यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा मुश्रीफ यांनी दिल्यानंतर पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला होता. 100 कोटींचा दावा ठोकण्यासाठी त्यावर स्टॅम्प ड्युटी किती भरावे लागते? याची माहिती मुश्रीफ यांना आहे का? असेल तर त्यांच्याकडे व्हाईट मनी तितका आहे का ? असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्यावर प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांनी त्याची चिंता करू नये. त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत. गरज लागल्यास आम्ही तुमच्याकडून घेऊ असा टोला मुश्रीफ यांनी लगावला. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
हे ही वाचा - मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा? २७०० पानांचे पुरावे सोमैय्यांनी दिले आयकर विभागाला