ETV Bharat / city

बंटी पाटील..! आम्ही सत्तेत आलो तर तुम्हाला झेपणार नाही, धनंजय महाडिकांचा पालकमंत्र्यांना इशारा - धनंजय महाडिकांचा पालकमंत्र्यांना इशारा

आज तुम्ही सत्तेत आहात. उद्या आम्ही सत्तेवर येणार आहोत. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला झेपणार नाही, असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिला आहे.

Former MP Dhananjay Mahadik
Former MP Dhananjay Mahadik
author img

By

Published : Aug 8, 2021, 1:06 AM IST

Updated : Aug 8, 2021, 1:26 AM IST

कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. त्यांनी हा दुरूपयोग थांबवावा. सत्ता हे निसर्गाचे चित्र आहे. परिवर्तन होत राहते. आज तुम्ही सत्तेत आहात. उद्या आम्ही सत्तेवर येणार आहोत. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला झेपणार नाही, असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिला आहे. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या आरोपावरून त्यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले, संसदेत पाठपुरावा केल्याने काम होत असतात. केवळ पत्रकबाजी केली तर चालत नाही. शिवसेनेच्या खासदारांनी माझ्यावर आरोप केले. मात्र माझ्या कार्यकाळात 274 कोटीची कामे झाली. भारतातील सर्वात पहिले पासपोर्ट केंद्र कोल्हापुरात झाले. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने पुरस्कारही मिळाला. केंद्र सरकारच्या उड्डाण अंतर्गत पहिली विमानसेवा कोल्हापुरात सुरू करण्यात आली. एएसआय हॉस्पिटल बंद होते. ते सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. हे केवळ हवेतील गप्पांमुळे शक्य झाले नाही तर सातत्याने पाठपुरावा केल्याने हे शक्य झाले. तुमच्या पालकांनी तुम्हाला आदेश दिल्यानंतर तुमच्याकडून पत्रक निघते, असा टोला देखील खासदार संजय मंडलिक यांना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला.

पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय महाडिक
निवडणुकीच्या तोंडावर वाट्टेल ते बोलू नये. त्यांनी शब्द मागे घ्यावेत. ज्यांनी बास्केट ब्रिज बद्दल आरोप केले आहेत. त्यांना तो ब्रिज बाटली ब्रिज वाटत असेल. असा टोलाही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना लगावला.

२२ हजार लोकांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम सतेज पाटील करत आहेत -

पालकमंत्री सतेज पाटील यांनी पदाचा गैरवापर केला आहे. सत्तेचा गैरफायदा घेत सोलापूर जिल्ह्यात असणारा माझा भीमा साखर कारखाना बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. स्वतःची लेटरहेड वापरून हा कारखाना बंद करण्याची मागणी केली आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी लोकांचा रोजगार वाचवायचा असतो, त्यांनी 22 हजार नागरिकांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम सुरू केले आहे. हीच मागणी खासदार संजय मंडलिक यांनी देखील केली आहे. खासदार मंडलिक व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पत्रकाचा मजकूर एकच आहे. त्यामुळे मंडलिक यांना कोण पत्रक पाठवायला सांगितले हे जनतेला कळले आहे. सोलापूर जिल्ह्यात यांचा काय संबंध येतो? शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साखर उद्योग वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र हे दोघे सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करत कारखान्याबाबत तक्रारी करत आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व त्यांचे हस्तक खासदार संजय मंडलिक यांनी घाणेरडे राजकारण थांबवावे. मनोवृत्ती व प्रवृत्ती पालकमंत्र्यांनी बदलावी, असा सल्लाही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे.

..तेव्हा पळताभुई थोडी केली असती -

मागील पाच वर्षात भाजपची सत्ता होती. त्या काळात मनात आणले असते तर पळताभुई थोडी केली असती. पण आमची प्रवृत्ती नाही. आज तुमची सत्ता आहे. उद्या आमची सत्ता येणार. आम्ही सत्तेवर आलो तर तुम्हाला झेपणार नाही. आमचा पराभव झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. मात्र पराभव झाला म्हणून दाढी वाढवून फिरलो नाही. सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत. असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

कोल्हापुरात कोरोनावाढीचे पाप सतेड पाटलांना लागणार -

देशात कोरोनावाढीचा दर कोल्हापुरात जास्त आहे. मृत्यूचा दर देखील जास्त आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे गोकुळची निवडणूक होय. कोरोनाचा काळ असताना निवडणूक घेतली गेली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. या सर्व काळात अनेक जणांचा मृत्यू झाला. त्याचे सर्व पाप पालकमंत्री सतेज पाटील यांना लागणार, असे वक्तव्य माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

कोल्हापूर महानगरपालिकेत पालकमंत्री सतेज पाटील यांची सत्ता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये देखील यांची सत्ता आहे. मात्र या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महापालिका हद्दीत येणारे सयाजी हॉटेल, ड्रीम वर्डचा घरफाळा थकीत आहे. कोट्यावधी रुपये कर बुडवला आहे. तर कोल्हापूर जिल्हा परिषद मधील 35 कोटीचा घोटाळा चर्चेत आहे. हे प्रकरण पुढे काय झालं? याची माहिती कोणालाच नाही. असे देखील माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

Last Updated : Aug 8, 2021, 1:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.