कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पंचगंगेच्या पातळीत संथ वाढ सुरूच आहे. सायंकाळी पंचगंगेने धोका पातळी ओलांडल्यानंतर अवघ्या तासाभरात पंचगंगेची मच्छिंद्री झाली आहे. धोका पातळी म्हणजेच पंचगंगा ४३ फुटावर गेल्यानंतर मच्छिंद्री होते. मच्छिंद्री म्हणजे पंचगंगेच्या शिवाजी पुलावर असलेल्या कमानीजवळ माशासारखा आकार तयार झाला आहे. त्याला पाणी लागले मच्छिंद्री झाली, असे म्हटले जाते. पंचगंगेची मच्छिंद्री आणि रेडे डोह फुटला की पंचगंगेला महापूर आला असे म्हटले जाते.
कोल्हापूरात महापूर आला का, यापेक्षा मच्छिंद्री झाली का? असा सर्वजण प्रश्न विचारत असतात. आता तुम्हालाही मच्छिंद्री म्हणजे काय, असा प्रश्न पडला असेल..तर ही बातमी वाचा..
परंपरागत मच्छिंद्री झाली म्हणजे महापूर आला असे मानले जाते. सलग तीन दिवस सुरू झालेल्या पावसामुळे आज चारच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पुलावरील कमानीजवळ माशा सारख्या असलेल्या आकारावर पाणी आले आणि कोल्हापुरात महापुराला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. मच्छिंद्री होईल, त्यावेळी कोल्हापुरात महापूर आला असे मानले जाते. महापूर आला की, कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभारगल्ली, या भागात व चिखली, आंबेवाडी या गावात पुराचे पाणी घुसायला सुरवात होते.
गेल्या 48 तासांमध्ये धरणातील पाणी नदीमध्ये न सोडता ही पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल वीस फुटांली वाढली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर शहरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राजाराम बंधारा आहे. या बंधाऱ्यावर नदीपात्रातील पाण्याने 39 फूट गाठले तर, इशारा पातळी मानली जाते. तसेच 43 फुटावर पाणी पोहोचले तर धोका पातळी समजून शहरात पाणी येऊ शकते, असे संकेत आहेत. त्यामुळे धोका पातळी झाल्यानंतर स्थलांतराचा वेग वाढविण्यात येतो.
पुणे-बेंगलोर महामार्गालगत पुराचे पाणी
कोल्हापूर-पुण्याकडे जाणारा NH-4 महामार्गालगतचे सर्विस रोड वर बुधले हॉल परिसरात व रस्त्यावर अर्धा ते एक फूट पाणी आलेले आहे. सदर ठिकाणी बॅरीकेटिंग लावून वाहतुकीस रस्ताबंद केला आहे. येथे योग्य तो बंदोबस्त नेमला आहे.
कोल्हापुरात 'महापूर', 'मच्छिंद्री' झाली; लवकरच शहरात पाणी घुसण्याची शक्यता