ETV Bharat / city

...म्हणून वडिलांनी स्वत:च्या 5 वर्षांच्या मुलाला फेकले पंचगंगा नदीत; कोल्हापूरच्या कबनूरमधील घटना - वडिलांनी मुलाला पंचगंगा नदीत फेकले

कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील कबनूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अफान सिकंदर मुल्ला असे पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. सद्या मुलाचा शोध सुरू आहे.

kolhapur
kolhapur
author img

By

Published : Oct 1, 2021, 2:24 PM IST

Updated : Oct 1, 2021, 7:54 PM IST

कोल्हापूर - वैद्यकीय उपचार परवडत नसल्याने जन्मदात्या वडिलांनीच आपल्या पाच वर्षांच्या मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील कबनूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अफान सिकंदर मुल्ला असे पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे वडील सिकंदर हुसेन मुल्ला (48) यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार यांना अटक करण्यात आली आहे. सद्या मुलाचा शोध सुरू आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया

आजारामुळे खर्च परवडत नव्हता -

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर मुल्ला हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या परिवारासोबत कबनूर येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा अफान नावाचा मुलगा आहे. मात्र, लहान असल्यापासून त्याला एका आजाराने वेढल्याने मुल्ला कुटुंबीय सतत आर्थिक संकटात होते. या खर्चाला कंटाळून सिकंदर मुल्ला यांनी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले. त्यांच्या पत्नी आणि मेव्हण्याने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम दिला. मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेर्‍या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदर मुल्ला यांनी गुरूवारी रात्री सायकलवरून पंचगंगा नदीत मोठ्या पुलावरून पाच वर्षाच्या मुलाला थेट फेकून दिले. त्यानंतर स्वतः घरी येऊन नातेवाईकांना मुलाला फेकून दिल्याची दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यावर कोणाचा विश्वास बसला नाही. मुलगा बेपत्ता असल्याची खात्री पटल्याने नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली त्यानुसार वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलाचा शोध सुरू -

निर्दयी वडील सिकंदर मुल्ला यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी पंचगंगा नदीत पाच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू केला आहे. इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने पंचगंगा नदीमध्ये मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या महिन्याभरात अशा पद्धतीने काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - शोधून शोधून दमले, पण परमबीर सिंग सापडेना - जयंत पाटील

Last Updated : Oct 1, 2021, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.