ETV Bharat / city

Shiv Sena Symbol: शिवसेनेसह यापूर्वी या 'दोन' पक्षांना बदलावी लागली होती चिन्ह; वाचा सविस्तर

author img

By

Published : Oct 12, 2022, 7:15 PM IST

Updated : Oct 13, 2022, 11:28 AM IST

Shiv Sena Symbol: सध्या राज्यामध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून आम्ही म्हणजेच शिवसेना असल्याचा दावा केला गेला आहे. हा वाद आता न्यायालयात आहे. यातच निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या Andheri Assembly By Election पार्श्वभूमीवर 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले. हा सगळा वाद एकीकडे सुरू असला, तरी कोल्हापूरात सुद्धा दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांची सुद्धा चिन्ह गोठविण्यात आली आहेत.

Shiv Sena Symbol
Shiv Sena Symbol

कोल्हापूर: सध्या राज्यामध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून आम्ही म्हणजेच शिवसेना असल्याचा दावा केला गेला आहे. हा वाद आता न्यायालयात आहे. यातच निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या Andheri Assembly By Election पार्श्वभूमीवर 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवले. हा सगळा वाद एकीकडे सुरू असला, तरी कोल्हापूरात सुद्धा दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांची सुद्धा चिन्ह गोठविण्यात आली आहेत. आमदार विनय कोरे MLA Vijay Kore यांच्या जनसुराज्य शक्ती पक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी Former MP Raju Shetty यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुद्धा हक्काची निशाणी आयोगाच्या नियमानुसार गोठविण्यात आली आहेत.

'नारळ' नंतर 'नारळाची बाग' : कोल्हापूरच्या राजकारणात एक महत्वाचे नाव असलेले शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांनी सुद्धा 2004 मध्ये स्वबळावर पक्षाची स्थापना केली. जनसुराज्य शक्ती असे त्यांनी आपल्या पक्षाला नाव दिले. त्यांनी यापूर्वी 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र 2004 ची निवडणूक त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून लढवली. यामध्ये त्यांनी आपल्या पक्षाकडून अनेकांना उमेदवारी सुद्धा दिली. पहिल्याच प्रयत्नात कोरे यांच्यासह एकूण 4 जणांनी गुलाल उधळत विधानसभा गाठली. त्यानंतर पुढील काही वर्षे याच चिन्हावर कोरे निवडणुकीला सामोरे गेले आहे.

नारळाची बाग : मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चिन्ह कायम ठेवण्यासाठी पात्रता पूर्ण होत नसल्याने त्यांचे हक्काचे आणि लोकांच्या मनामनात बसलेले चिन्ह त्यांच्या हातातून निघून गेले. कोरे आणि नारळ हे समीकरण असल्याने त्याला जुळणारेच चिन्ह असावे, म्हणून त्यांनी नारळाची बाग हे चिन्ह निवडले आयोगाने सुद्धा त्यांना ते चिन्ह दिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते याच चिन्हावर निवडणुकीला सामोरे गेले आणि पुन्हा निवडून आले आहे.

'शिट्टी' पासून 'बॅट' पर्यंत : माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा अपक्ष निवडणुकीपासून सुरुवात करत, नंतर शेतकरी चळवळीत काम केले आहे. शेतकरी संघटनेतून बाहेर पडून त्यांनी 2009 मध्ये स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' असे पक्षाचे नाव ठेवून त्यांनी 2009 ची लोकसभेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांना आयोगाकडून त्यांच्या नावाशी जुळणारे 'शिट्टी' हे चिन्ह मिळाल्याने त्यांनी त्यानंतरची 2014 ची निवडणूक सुद्धा शिट्टी चिन्हावर लढवली. मात्र यांच्या सुद्धा पक्षाला 2019 च्या निवडणुकीत चिन्ह कायम ठेवण्यासाठी ज्या पात्रता लागतात, त्या पूर्ण होत नसल्याने 'शिट्टी' हे चिन्ह गमवावे लागले आणि शेवटी त्यांना 'बॅट' हे चिन्ह मिळाले. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Last Updated : Oct 13, 2022, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.