ETV Bharat / city

संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज - महापुराचा धोका

कोल्हापुरात 2019 च्या महापुराच्या अनुभवावरून आणि यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले सुरू केले आहे. पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज
author img

By

Published : Jun 2, 2021, 3:48 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात 2019 मध्ये महापुराने अक्षरशः थैमान घातले होते. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे या मोठ्या संकटातूनही कोल्हापूरकर सावरले. पण महापुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली. त्यामुळे महापुराच्या अनुभवावरून आणि यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले असून पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली आहे. जिल्ह्यात 50हून अधिक रबर बोटी उपलब्ध असून बाराशेहून अधिक स्वयंसेवकांची फौज तयार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज

2 दिवसांपूर्वी जलसंपदामंत्र्यांची पार पडली आढावा बैठक

धरणक्षेत्र वगळता कॅचमेंट भागात जास्त पाऊस पडतो त्यामुळे त्या पावसाचा फटका सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसतो. संभाव्य पूरस्थितीचा फटका बसू नये, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे व पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पूरस्थितीत फ्रंटलाईन वर कार्यरत रहावे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी 31 मे रोजी आवाहन केले होते. शिवाय पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी दक्ष असावे. कर्तव्यात कसूर करु नये अन्यथा गय केली जाणार नाही, असा इशारा सुद्धा जयंत पाटील यांनी दिला होता. येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग सुद्धा साधनसामग्रीनिशी सज्ज झाला आहे.

संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीवर एक नजर
साधनसामग्रीमध्ये इन्फ्लेटेबल रबर बोट-ओबीएमसह, रबर बोट जुन्या आणि नव्या मिळून जवळपास 50, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाइफ बाइज- 30, सेफ्टी हेलमेट- 50, मेगा फोन- 21, फ्लोटिंग पंप-7, स्कुबा डायव्हिंग सेट- 2, लाइफ जॅकेट- 200, लाइफ बॉयरिंग- 306, सर्च लाइट -20, हेड लाईट विथ झूम – 10, फ्लोटिंग रोप मिटर- 100 , इन्फ्लेटेबल लाइफ जॅकेट -50, अंडर वॉटर सर्च लाइट-10 तसेच आस्का लाइट- 18 यांचा समावेश आहे. संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची आज खातरजमा करण्यात आली. शिवाय जिल्हयातील स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र असे बाराशे हून अधिक स्वयंसेवकांचे रेस्क्यू फोर्स तैनात करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यामध्ये 100च्या वर हे स्वयंसेवक तैनात असणार आहेत.

आता 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित
जिल्हाधिकारी कार्यालयात आता 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तीन शिफ्टमध्ये 25 कर्मचारी तैनात करण्यात आले असून संभाव्य पूरपस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे. यासाठी नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 0231-2659232 तसेच पोलीस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी 100 तसेच 0231-2662333 असे दुरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाने सर्व धरण प्रकल्पावर तसेच जिल्हास्तरावरही आपत्ती नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'मराठा समाजाला 3 हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज द्या'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.