ETV Bharat / city

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत योग्यच वक्तव्य केले - दिग्विजय सिंह - राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत योग्यच वक्तव्य केले

राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सावरकरांबाबत योग्यच वक्तव्य केले आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Senior Congress leader Digvijay Singh ) यांनी म्हटले. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra ) पोहोचावी यासाठी 1000 हून अधिक गावांमध्ये यात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा कोल्हापूर काँग्रेसने ( Kolhapur Congress ) उपक्रम हाती घेतला आहे याच्याच उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Digvijay Singh
दिग्विजय सिंह
author img

By

Published : Oct 9, 2022, 6:52 AM IST

Updated : Oct 9, 2022, 7:21 AM IST

कोल्हापूर : सावरकरांनी देशाच्या फाळणीचा आणि पाकिस्तान निर्मितीचा विषय पहिला त्यांच्या पुस्तकातून मांडला. मोहम्मद जिना यांनी त्याला समर्थन दिले होते. या दोघांनी फाळणीचा विषय मांडला. फाळणीचा आरोप काँग्रेसवर होतो हे चुकीचे आहे. 1925 पासून हिंदू मुस्लिम हा जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा होता. दरम्यान, राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी सावरकरांबाबत योग्यच वक्तव्य केले ( Rahul Gandhi made a right statement about Savarkar ) आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Senior Congress leader Digvijay Singh ) यांनी म्हटले. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra ) पोहोचावी यासाठी 1000 हून अधिक गावांमध्ये यात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा कोल्हापूर काँग्रेसने ( Kolhapur Congress ) उपक्रम हाती घेतला आहे याच्याच उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

दिग्विजय सिंह

मोहन भागवत मज्जिद मध्ये गेले हे या भारत जोडो यात्रेचे यश : कधीही न पाहिलेले चित्र आता देशात दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत मज्जिदमध्ये मदरसांमध्ये जात आहेत या भारत जोडो यात्रेचे यश आहे, असेही दिग्विजय सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले. शिवाय देशात महागाई वाढली आहे. आता मोदी का गप्प बसले आहेत असा सवाल त्यांनी देशातील महागाईचा मुद्दा उपस्थित केला.

यामुळे राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे : यावेळी बोलताना दिग्विजय सिंग यांनी पहिल्यांदाच भाजप बॅकफुटवर गेली आहे, त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे असे म्हटले. सुरू असलेल्या या भारत जोडो यात्रेतून राहुल गांधी यांच्या विरोधकांनी केलेली प्रतिमा आता बदलत चालली आहे. त्यांच्या यात्रेला अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधक सुद्धा आता अस्वस्थ झाले आहेत असेही ते म्हणाले.

Last Updated : Oct 9, 2022, 7:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.