ETV Bharat / city

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आमची जान.. त्यांच्या समर्थनार्थ उद्या राज्यभरात नोटीसची होळी करणार : चंद्रकांत पाटील

मुंबई पोलिसांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस ( Mumbai Police Notice To Devendra Fadnavis ) दिल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil ) यांनी राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला ( BJP Will Protest Tomorrow ) आहे. देवेंद्र फडणवीस आमची जान आहेत. त्यांच्या समर्थनार्थ उद्या राज्यभरात नोटीसची होळी करणार असल्याचं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 12, 2022, 8:45 PM IST

कोल्हापूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवली ( Mumbai Police Notice To Devendra Fadnavis ) असल्यानं भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आमची जान आहे. त्यामुळं भाजपच्यावतीने उद्या राज्यभरातील कार्यकर्ते हे फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीशीची होळी करणार ( BJP Will Protest Tomorrow ) असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil ) यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) आणि आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांना ज्यावेळेस चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले त्यावेळेस त्यांना आठ ते नऊ तास पोलिस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं होतं. उद्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना किती वेळ पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवतात हे पाहाव लागेल. देवेंद्र फडणवीस यांचे चाहते भरपूर आहेत. पोलीस स्टेशनला देवेंद्र यांना पोलीस स्टेशनला घेऊन घेल्यास हजारो कार्यकर्ते तेथे जमा होतील असं पाटील यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस आमची जान.. त्यांच्या समर्थनार्थ उद्या राज्यभरात नोटीसची होळी करणार : चंद्रकांत पाटील

कायद्याने विरोधी पक्षनेत्याची चौकशी करता येत नाही

महाविकासआघाडी सरकारचा गेले 2 वर्ष चोराला सोडून सावला पकडण्याच काम सुरू आहे. बदल्यांमध्ये झालेले पैशाचे व्यवहार, अनियमितता याबाबतची देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडणी करत आवश्यक ते तांत्रिक मुद्दे असलेला पेनड्राईव केंद्रीय गृह विभागाला दिला होता. याबाबतची चौकशी करायची सोडून तुम्हाला हे कसे मिळाले म्हणत राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलावले आहे. हे सरकार म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी झाली असून, मुळात विरोधीपक्षनेत्याची अश्याप्रकारे चौकशी करता येत नाही. सरकारवर अंकुश राहावा यासाठी विरोधीपक्षनेता असतो. सध्या महविकास आघाडीचे नेते एका नंतर एक जेलमध्ये जात असल्याने सरकार घाबरले आहे. म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना आत घालण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

उद्या राज्यभर नोटीसाची होळी करणार

देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसची होळी करण्याचा कार्यक्रम उद्या राज्यभर करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस बाहेर फिरत असताना हजार पाचशे लोक बाहेर त्यांच्यासोबत असतात. चौकशीसाठी त्यांना पोलिस स्टेशनला नेणार असतील तर त्यांच्या समर्थनार्थ किती लोक येतील हे पाहणे उत्सुकतेचे असल्याचे ते म्हणाले आहेत. गेल्या 27 महिन्यात महाविकासआघाडी सरकार एकाही केसमध्ये जिंकले नाही. प्रत्येक वेळेस तोंडावर पडायचे काम हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस हे आमची जान आहेत. त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्त्यांसकट सामान्य नागरिक सुद्धा असणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.