ETV Bharat / city

Omicron In Kolhapur : कोल्हापूरकरांची चिंता वाढली.. ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत झाली 'इतकी' वाढ - मुलांचे लसीकरण कोल्हापूर

कोरोनामुळे कोल्हापूरकरांची चिंता आता वाढू लागली ( Omicron Threat Kolhapur ) आहे. कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे तीन नवे रुग्ण कोल्हापूर शहरात आढळून आले ( 3 New Omicron Patient Found In Kolhapur ) आहेत. त्यामुळे ओमायक्रोची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ५ झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगण्यात आलेआहे.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Jan 5, 2022, 5:29 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ओमायक्रॉनचा विळखा हळूहळू घट्ट होताना दिसत ( Omicron Threat Kolhapur ) आहे. काल (ता. ४) ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत आणखी ३ बाधितांची भर पडली ( 3 New Omicron Patient Found In Kolhapur ) आहे. शहरातील सुर्वेनगर, नागाळा पार्कसह शहरातील अन्य एका परिसरातील हे रुग्ण आढळून आले आहेत.

पालिका करणार कडक उपाययोजना

३ तारखेला नागाळा पार्क येथे आढळलेल्या ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णाच्या मुलीचा रिपोर्टदेखील पॉझिटिव्ह आला आहे. याआधी कळंबा परिसरातील आयटीआय आणि महानगरपालिका ( Kolhapur Municipal Corporation ) हद्दीतील नाकाळा पार्क परिसरात ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले होते. यामुळे शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दोन झाली होती. यात आज तीन रुग्णांची भर पडल्याने ही संख्या पाचवर गेली आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्याबाबत हालचालींना सुरू झाले आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज

वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्भूमीवर कोल्हापूर आरोग्य प्रशासन सज्ज झालेले आहे. जिल्ह्यात एकूण नॉन ऑक्सिजन 11 हजार तर 4 हजार ऑक्सिजन बेड सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आणि खासगी असे 404 व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध आहेत. तर, बंद केलेले विलीनीकरण कक्ष पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली चालू करण्यात आले आहेत. तसेच लहान मुलांचे लसीकरण ( Children Vaccination Kolhapur ) अधिक जलद गतीने करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन लसीकरण मोहीम राबवत आहेत. मंगळवारी महापालिकेच्यावतीने शहरामध्ये महाविद्यालय व शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील 3334 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.