कोल्हापूर - 14 नोव्हेंबर या बालदिनानिमित्त बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या शनिवार 8 ते 14 नोव्हेंबर बालदिवस सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.आय.सी.शेख यांनी दिली. शिवाय या निमित्ताने विविध उपक्रम आणि स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
उपक्रमाचे स्वरूप -
बाल दिनानिमित्त 7 गटात विविध उपक्रम आणि स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक उपक्रमासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : 8 ते 14 नोव्हेंबर बालदिवस सप्ताह; विविध उपक्रमांसह स्पर्धांचे आयोजन
14 नोव्हेंबर या बालदिनानिमित्त बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार 8 ते 14 नोव्हेंबर बालदिवस सप्ताह कोल्हापुरात साजरा करण्यात येणार