ETV Bharat / city

आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत, प्रस्ताव आला तर.. शिंदेंच्या बंडावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

सत्ता परिवर्तनाबाबत आपल्याला माहिती नाही. सध्या राज्यात सुरू ( Chandrakant Patil on eknath shinde rebel ) असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे, आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Chandrakant Patil comment on eknath shinde rebel
एकनाथ शिंदे बंड चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 24, 2022, 12:58 PM IST

Updated : Jun 24, 2022, 2:21 PM IST

कोल्हापूर - सत्ता परिवर्तनाबाबत आपल्याला माहिती नाही. सध्या राज्यात सुरू ( Chandrakant Patil on eknath shinde rebel ) असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे, आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. शिवाय शरद पवार आणि संजय राऊत काय बोलतात हे माध्यमांच्या माध्यमातूनच समजत आहे. पण, त्या दोघांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा जास्तच आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी अनेक प्रश्नांवर सावध प्रतिक्रिया दिली. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा - Political Crises In Maharashtra : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर सुद्धा शिंदे यांच्यासोबत ? बंडखोरांच्या फोटोत झळकले यड्रावकरांचे भाऊ

प्रस्ताव आला तर पुढे निर्णय घेऊ - यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड करून सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे, याबाबतच काही प्रस्ताव आला आहे का याबाबत विचारले असता ते म्हणाले, अध्याप असा प्रस्ताव आला नाहीये. जरी प्रस्ताव आला तर आमची महाराष्ट्रात 13 जणांची कोअर कमिटी आहे. त्याबाबत आम्ही चर्चा करतो, त्यानंतर तो प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवतो, मगच निर्णय होतो, असेही पाटील म्हणाले. त्यामुळे, प्रस्तावच अध्याप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत ? कोण जाणार आहेत ? कोण परत येणार आहे याबाबत आपल्याला काही माहिती नाही. शिवाय मोहित कंबोज गुजरात येथील विमानतळ येथे दिसले होते. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ते सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत. कदाचित ते सर्वत्र दिसतात, शिवाय शिंदे यांच्यासोबत कंबोज दिसले असतील तर ते एकनाथ शिंदे यांचे मित्र आहेत, त्यामुळे सोबत असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सगळा ठाकरेंचाच प्लान ? - यावेळी या सगळ्या घडामोडी पाहता हा सगळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच प्लॅन आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की, ते आपली इतकी बदनामी करून घेतील असे वाटत नाही. पण, हा अभ्यासाचा विषय असल्याचेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : आमदारांनंतर खासदार सुद्धा शिंदेंच्या गळाला! मग माजी आमदारांचे काय?

Last Updated : Jun 24, 2022, 2:21 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.