ETV Bharat / city

कोल्हापुरातील महागणपती मंडळाने केला कोरोना नियमांचा भंग; मिरवणूक काढल्याने १२५ जणांवर गुन्हा - महागणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोल्हापुरातील मानाचा आणि महागणपती समजला जाणारा छत्रपती शिवाजी चौकातील तरुण मंडळाने कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचा भंग करत गणेश आगमनाची मिरवणूक काढली. ढोल वाद्यांच्या पथकासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचादेखील समावेश आहे.

महागणपती मंडळाने केला कोरोना नियमांचा भंग

author img

By

Published : Sep 11, 2021, 10:54 AM IST

Updated : Sep 11, 2021, 1:37 PM IST

कोल्हापूर- कोल्हापुरातील महागणपती समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ढोल वादक पथकातील सदस्य असे तब्बल एकूण 125 जणांचा समावेश आहे. या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी बंदी असताना देखील पापाची तिकटी येथून गणेशमूर्तीच्या आगमनाची मिरवणूक काढल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिरवणूक काढल्याने १२५ जणांवर गुन्हा
कोल्हापुरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. तर गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास प्रशासानाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक तरुण मंडळाने या नियमांचा भंग केला आहे. गणेश आगमन मिरवणूक काढत गर्दी करणे, सामाजिक आंतर न ठेवणे,मास्क न वापरणे हे धाब्यावर बसवून कोरोनाचे नियम मोडले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

कोल्हापुरातील मानाचा आणि महागणपती समजला जाणारा छत्रपती शिवाजी चौकातील तरुण मंडळाने कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचा भंग करत गणेश आगमनाची मिरवणूक काढली. ढोल वाद्यांच्या पथकासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात माजी महापौर नंदकुमार वळंजू यांचादेखील समावेश आहे. वळंजू यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ढोल वादक पथकातील 125 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच राजारामपुरी परिसरात कोरोना नियमाचा भंग करून गर्दी करत मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन मंडळावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Last Updated : Sep 11, 2021, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.