ETV Bharat / city

Kolhapur North Bypoll : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रणधुमाळी; काँग्रेस जागा टिकवणार की भाजप झेंडा फडकवणार? - भाजप विरुद्ध महाविकास आघाडी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Kolhapur North Bypoll) रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये भाजप विरूद्ध महाविकास आघाडी (BJP Vs Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे. 12 एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

Kolhapur North Bypoll
सत्यजित कदम-जयश्री जाधव फाईल फोटो
author img

By

Published : Mar 19, 2022, 4:22 PM IST

Updated : Mar 19, 2022, 5:38 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Kolhapur North Bypoll) रणधुमाळी गुरुवार 17 मार्चपासून सुरू झाली. यामध्ये भाजप विरूद्ध महाविकास आघाडी (BJP Vs Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. शिवसेनेनेसुद्धा याठिकाणी जोरदार तयारी केली होती. मात्र, या ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते, म्हणत महाविकास आघाडीने पुन्हा एकदा एकत्र येत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा (Shivsena support Congress Candidate) देण्याबाबत एकमत झाले आहे. त्यामुळे आता भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना या पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. 12 एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

भाजपकडून सत्यजित उर्फ नाना कदम (Satyajeet Kadam) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांनाच उमेदवारी मिळणार आहे. काँग्रेसकडून अद्याप त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही. दरम्यान, या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील तसेच धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जनता कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • पारंपरिक विरोधकांची प्रतिष्ठा पणाला :

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र, जाधव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देऊ असे पालकमंत्री सतेज पाटील तसेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही म्हंटले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट झाली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा सेनेचा बालेकिल्ला आहे म्हणत पक्षश्रेष्ठींकडून जे आदेश येतील त्यानुसार आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हंटले होते. मात्र, मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत येथे पाहायला मिळणार आहे. दरम्यान, कोल्हापूरातील राजकारणात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचे नाव महत्वाचे असते. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये टोकाची ईर्षा कोल्हापूरकरांनी अनुभवली आहे. आता कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • शिवसेनेचे माजी आमदार क्षीरसागर यांची भूमिका निर्णायक :

दरम्यान, पोटनिवडणूकीची चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे म्हणत त्यांनी या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत व्हावी असेही आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले होते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी काँग्रेसचे आमदार होते त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे असावी असे मत मांडत शिवसेनेकडून ही जागा काँग्रेसला सोडली. त्यामुळे ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, क्षीरसागर तसेच त्यांचे समर्थक मात्र नाराज असल्याची चर्चा असून, आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढविण्याची इच्छा होती. शिवाय इथल्या जनतेलासुद्धा क्षीरसागर याठिकाणी निवडून जावे असे वाटत होते, असे क्षीरसागर यांनी यापूर्वीही म्हंटले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच सेनेने काँग्रेसला जागा सोडल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, यामध्ये क्षीरसागर यांची भूमिका निर्णायक असणार आहे.

  • काय झाले होते गतवेळच्या निवडणुकीत?

गतवेळच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती. ते एकत्र मिळूनच या निवडणुकीत सामोरे गेले आणि शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत चंद्रकांत जाधव यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिली होती. यामध्ये एकूण 1 लाख 75 हजार 325 मतदानापैकी चंद्रकांत जाधव यांनी तब्बल 91 हजार 053 इतकी मते घेत याठिकाणी विजय मिळविला. क्षीरसागर यांना 75 हजार 854 इतकी मते मिळाली त्यामुळे त्यांचा जवळपास 15 ते 16 हजार मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कमी कालावधीत प्रचार करून त्यांनी याठिकाणी विजय मिळवल्याने सर्वत्र चर्चा सुरू होती. 2 डिसेंबर 2021 रोजी चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली.

  • उत्तरमध्ये भाजपचाच विजय निश्चित : सत्यजित कदम
    भाजप उमेदवार सत्यजित कदम

भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आपण यापूर्वीसुद्धा या मतदारसंघातुन निवडणूक लढवली होती असे म्हंटले आहे. त्यामुळे यावेळी लढाई आपल्यासाठी अवघड नाही. शिवाय लोकांचे अनेक प्रश्न घेऊन मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. लोकांचा भाजपवर विश्वास असून निवडणुकीचा निकाल भाजपच्याच बाजूने लागेल, असाही विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

  • उत्तर पोटनिवडणुकीत 'आप'ची एन्ट्री :

दरम्यान, पंजाब राज्यात एकहाती सत्ता आलेल्या आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आपने कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत एन्ट्री केली आहे. याठिकाणी आम आदमी पक्षसुद्धा उमेदवार देणार असून संदीप देसाई यांचे नाव चर्चेत आहे. नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी कोल्हापूर येथे येऊन आढावा बैठक घेतली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाकडूनसुद्धा येत्या दोन दिवसांत उमेदवार कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.

  • बिनविरोधाबाबत सतेज पाटील यांचे आवाहन मात्र चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसची जागा असल्याने शिवाय दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण ही निवडणूक बिनविरोध करून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून द्यावे असे म्हंटले होते. मात्र, जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेवक होत्या. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाल्याने त्यांनीसुद्धा आपण काँग्रेसकडूनच या जागेवर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा जयश्री जाधव यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही. मात्र, त्या भाजपच्या नगरसेविका होत्या, त्यामुळे त्या भाजपकडून असतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पाठिंबा देत असतील तर आम्ही आजही बिनविरोध करायला तयार होतो, असे म्हंटले आहे.

Last Updated : Mar 19, 2022, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.