ETV Bharat / city

MLA Chandrakant Jadhav Death : चंद्रकांत जाधवांच्या जाण्याने साध्या राहणीच्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो - चंद्रकांत पाटील - साध्या राहणीच्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो

कोल्हापूरच्या राजकारणातील एक निगर्वी, मितभाषी, सुस्वभावी आणि साध्या राहणीच्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. शिवाय माझ्या जवळच्या मित्राला दुरावलो, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Dec 2, 2021, 8:15 PM IST

Updated : Dec 2, 2021, 8:26 PM IST

कोल्हापूर - आमदार चंद्रकांत जाधव ( MLA Chandrakant Jadhav Death ) यांचे आकस्मिक निधन दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या जाण्याने कोल्हापूरच्या राजकारणातील एक निगर्वी, मितभाषी, सुस्वभावी आणि साध्या राहणीच्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. शिवाय माझ्या जवळच्या मित्राला दुरावलो, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शोक व्यक्त करतांना
  • 'चंद्रकांत जाधव गेले यावर विश्वासच बसत नाही'

शोक व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सकाळी चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याची बातमी जेंव्हा कानावर पडली तेंव्हा यावर विश्वासच बसला नाही. जाधव हे अतिशय गरिबीतून पुढे आले आहेत. त्यांनी उद्योग क्षेत्रात तर उल्लेखनीय काम केले आहेच शिवाय अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. याबरोबरच फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. राजकारणात सुद्धा त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात भाजपा सहभागी असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 'खिलाडूवृत्ती जपत फुटबॉल खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना सहाय्य'

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सुद्धा शोक व्यक्त केला. ते म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव आण्णा यांचे आज निधन झाले. त्यांचे अचानक जाणे सर्वांसाठी धक्कादायक आहे. त्यांनी आपली खिलाडूवृत्ती जपत फुटबॉल खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना सहाय्य केले. संघर्षातून एक सफल उद्योजक म्हणून ओळख निर्माण करत अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. समाजकार्यात मदतीला तत्पर असणारे आण्णा हे संवेदनशील व्यक्तिमत्व होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा

दरम्यान, आज दुपारी चंद्रकांत जाधव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. पुढे शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान, त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोक आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - MLA Chandrakant Jadhav Death : कोल्हापुरातील आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबादेत निधन

Last Updated : Dec 2, 2021, 8:26 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.