कोल्हापूर - दिशा सालीयन प्रकरणी काहीही राजकारण नाही. 7 मार्चपर्यंत सर्व पुरावे समोर येतील. त्यामुळे काहीही घाबरू नका या प्रकरणात कोनाकोणाचा सहभाग आहे आणि कोणाला जेल मध्ये जायचं आहे हे स्पष्ट होईल असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil On Disha Salian Case ) यांनी केलाय. शिवाय शिवराळ भाषा सुरू आहे. ती यासाठीच सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले असून ही तर दिवा विझन्यापूर्वीची फडफड आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधत होते.
नितेश राणेंचे ट्विट -
दिशा सालीयन प्रकरणी पुन्हा राजकारण सुरू आहे याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये काहीही राजकारण नाही मात्र 7 मार्च पर्यंत सर्व काही बंदिस्त होते ते पुरावे समोर येतील असा गौप्यस्फोट आज कोल्हापूरात केला. दरम्यान, आमदार आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा सालीयनला आठ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीज कार मधून तिच्या महाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडे सुद्धा काळी मर्सिडीज आहे, जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का ? असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर देताना याचा प्राथमिक तपास मालवणी पोलिसांनी केला आहे. त्यामुळे अहवाल पाहणे गरजेचे आहे. या अहवालात किती तथ्य आहे हे पाहून चाचपणी केली जाईल आणि कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही असेही चाकणकर यांनी आज म्हटले आहे. दरम्यान, यावरच चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून सर्वकाही पुरावे 7 मार्च ला समोर येतील आणि कोणकोण यामध्ये सहभागी आहे समजेल असेही म्हटले आहे. त्यामुळे यामध्ये काय समोर येणार हेच पाहावे लागणार आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली दिशा सालीयन यांच्य कुटुंबियांची भेट -
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून भाजपचे नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी ( Mayor Kishori Pednekar and Complaint to Women Commission ) केलीय. महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल महिला आयोगाला पत्र ( Women Commission orders in Disha Salian Case ) पाठवल्या नंतर आज पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन यांच्या चारीत्र्यावर संशय निर्माण करून बदनामी करणारे ट्विट केले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या दिशा सालियन हिच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या दोन सदस्या यांची त्यांची भेट ( Mayor Kishori pednekar meet Disha Salian family ) घेतली आहे.
हेही वाचा - Disha Salian Murder Case : दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंचे ट्विट, म्हणाले 'ती काळी मर्सिडीज....'