पुणे - राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजप आता विधान परिषदेच्या जागेसाठी तयारी करत ( Chandrakant Patil on MLC Election ) आहे. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना भाजपचा पाठिंबा असलेले रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होता. मात्र त्यांनी तो अर्ज मागे घेतला आहे. यामुळे उर्वरित 11 उमेदवार हे विधान परिषदेच्या सहा जागेचा निवडणुकीसाठी सामोरे जाणार ( legislative council Election ) आहेत. विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमची जीत ही महा विकास आघाडीचा नैतिक पराभव असेल, असे ते म्हणाले आहेत. तर जिल्ह्याच्या राजकारणात यापुढे हम करे सो कायदा चालणार नाही. 2019 च्या निवडणुकीनंतर काही लोकांचे आकाशाला हात लागले होते. इतका दिवस महविकास आघाडीचा वनवे सुरू असलेल्या कारभाराला आता कुठेतरी छेद मिळाला आहे. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले ( Chandrakant Patil criticized Satej Patil ) आहेत. ते आज (सोमवार) कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्र्यांना चंद्रकांत पाटलांचा इशारा - कोल्हापूर जिल्ह्यात 2019च्या निवडणुकीनंतर काही लोकांना असे वाटू लागले की, आपले हात आकाशाला टेकले आहेत. मात्र अशा लोकांना 2014 ला येथे उमेदवार निवडून आणता आला नव्हता. अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांना त्यांनी टोला लगावला आहे. 2019 नंतर काहीजणांना भाजप कोल्हापुरातून हद्दपार करून टाकायचे हे स्वप्न पाहात होते. त्यासाठी त्यांनी अनेक जणांना दबाव टाकण्यात आले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडून पैसे सापडल्याचा आरोप गेला. ते पैसे आता कुठे आहेत. त्या तक्रारींचे काय झाले, असा सवालही त्यांनी विचारला आहे. तर जिल्ह्यात इतक्या दिवस हम करे सो कायदा चालत होता. आता तसे चालणार नाही. वनवे सुरू असलेला कारभाराला आता संपूर्णपणे छेद मिळाला आहे. या अगोदर आम्ही मुंगी होवून साखर खात होतो. मात्र आता कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास दिला तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता सतेज पाटील यांना दिला आहे. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्यासह भाजपचे सर्व मित्र पक्ष मिळून सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
तर महाविकास आघाडीचा हा नैतिक पराभव असेल - राज्यसभेचे निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे भाजपचा मोर्चा वळला आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता . यामध्ये सदाभाऊ खोत यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला तसेच राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. मात्र ठरल्याप्रमाणे अजून एक अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. तो घेतला न गेल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे नक्की झाले आहे. तसे 20 जून ला विधान परिषदेच्या निवडणुका होणार असून भाजपला ही एक मोठी संधी आहे राज्यसभेच्या निवडणुकीत दाखवून मतदान झाले असताना महा विकास आघाडी पराभूत झाली. विधानपरिषदसाठी भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत, त्या सर्व जागा आम्ही निवडून आणणार म्हणजे महाविकास आघाडीचा हा नैतिक पराभव असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.