ETV Bharat / city

BJP Aggressive : कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी भाजप आक्रमक

पूररग्रस्तांना शासनाकडून मदत मिळाली नसल्याच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरला महापुराचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी देखील कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महापुराचा फटका बसला होता.

author img

By

Published : Jun 1, 2022, 8:41 PM IST

bjp
भाजप

कोल्हापूर - पूररग्रस्तांना शासनाकडून मदत मिळाली नसल्याच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरला महापुराचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी देखील कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महापुराचा फटका बसला होता. यावेळी महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्यापी एक वर्ष उलटून गेल्यानंतरही यापूर्वी त्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. याबाबतची माहिती भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

या आहेत मुख्य मागण्या -

१.पूरग्रस्तांच्या मदतीला भ्रष्टाचार थांबवा व त्यांची चौकशी करा.

२. पूरग्रस्तांना त्वरित योग्य नुकसान भरपाई द्यावी.

३.पूरग्रस्त शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई द्यावी.

४.कोल्हापूर शहरातील जयंती नाला सह सर्व नाले ओढे यांची सफाई करावी.

५.नदीपात्र क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम था व त्यावर त्वरित कारवाई करावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.