कोल्हापूर - जमिनीच्या वादातून चार कुटुंबांतील सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन या चार कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे, पालकमंत्री सतेज पाटीलही कार्यालयात उपस्थित होते. जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या सर्वांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबांचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न - kolhapur police news
जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या सर्वांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
![जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबांचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8427188-244-8427188-1597470376294.jpg?imwidth=3840)