कोल्हापूर - कोल्हापूरच्या ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या १९ दिवसांपासून स्टुडिओच्या दारात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज (गुरुवारी) अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यावरून मास्क परिधान करत मूक रॅली काढण्यात आले. यावेळी ८ दिवसांत संबंधित प्रश्नावर कारवाई केली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
जयप्रभा स्टुडिओची २ वर्षापूर्वीच विक्री झाल्याने कोल्हापूरकर आणि कलाकार आक्रमक झाले आहेत. दरम्यान चित्रपट महामंडळाने जोपर्यंत स्टुडिओ पुन्हा मिळत नाही आणि चित्रीकरण पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानी आज काढलेल्या रॅलीत शेकडो सभासद सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या तोंडावर मास्क परिधान करण्यात आला होता.
'...तर विकत घेणाऱ्याच्या घरावर मोर्चा काढणार'
जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी गेले 18 दिवस साखळी उपोषण करण्यात येत आहे. मात्र या उपोषणाची दाखल अद्याप कोणी घेतली नसल्याने आज आंदोलनाच्या 19 व्या दिवशी जयप्रभा बचावचे लक्षवेधी फेस मास्क घालून रॅली काढण्यात आली. सकाळी कोल्हापुरातील खरी कॉर्नर येथून चित्रपट सुरू करताना वापरण्यात येणाऱ्या कल्यापचे वापर करून या रॅलीला सुरुवात झाली. लक्षवेधी असणाऱ्या रॅलीमध्ये सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर फेस मास्क घातले होते. या फेस मास्कवर जयप्रभा बचाव असे लिहिले होते. भविष्यात जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी विकत घेणाऱ्यांच्या घरावर देखील मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आहे. कोल्हापुरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड होते. जी जागा हेरिटेज वास्तूमध्ये होती. त्याचीच विक्री झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'याला वादळ नाही आदळ-आपट म्हणतात' संजय राऊत यांचा भाजपला टोला