ETV Bharat / city

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - Shivaji University news

राज्यात पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तसेच राज्य शासनाने दिलेल्या नव्या नियमांनुसार शिवाजी विद्यापीठाने पुन्हा एकदा उर्वरित सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

author img

By

Published : Apr 6, 2021, 7:12 AM IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्याबाबत रात्री उशिरा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. ६ एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत या सर्व परीक्षा पार पडणार होत्या. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शिवाजी विद्यापीठाने या परीक्षा रद्द करत असल्याचे पत्रक जारी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे निर्णय
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शिवाजी विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ना त्या कारणाने पुढे ढकलण्यात येत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यापीठाने ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने 22 मार्चपासून सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली होती. मात्र राज्यात पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तसेच राज्य शासनाने दिलेल्या नव्या नियमांनुसार शिवाजी विद्यापीठाने पुन्हा एकदा उर्वरित सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने ६ एप्रिल ते 12 एप्रिल 2021 या कालावधीतील सर्व अभ्यासक्रमांच्या होणाऱ्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्याबाबतचे पत्रक विद्यापीठातील विभाग सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांना देण्यात आले आहे. परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमधून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा - मुंबईतील रूग्णालयांचे 15 दिवसांत फायर ऑडिट सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.