कोल्हापूर : सर्व परीक्षा ऑफलाईन एम सी क्यू (MCQ) पद्धतीने घ्याव्या या मागणीसाठी विद्यार्थी अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन (Agitation) करत होते. त्यानुसार विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना NSUI व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी साखर- पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
विद्यापीठाची ऑफलाईन परीक्षेची तयारीपण : दरम्यान, शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र आता विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून विद्यापीठाने परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा नव्या प्रश्नपत्रिका तसेच 4 लाखांहून अधिक ओएमआर शीट विद्यापीठाला बनवाव्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाला यासाठी जवळपास 20 ते 25 दिवस लागण्याची शक्यता असून जुलै महिन्याच्या अखेरीस या परीक्षा होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.