कोल्हापूर : सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्राच्या संथ कारभाराला कंटाळून आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या नुकसानीमुळे आज अखिल भारतीय मराठा महासंघाने कोल्हापुरातील सारथी उपकेंद्रावर लक्षवेधी आंदोलन केले आहे. कोल्हापुरात 26 जून 2020 पासून सारथी उपकेंद्र सुरू केले आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरसह सातारा, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मराठा तसेच मराठा घटकांसाठी संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास करिता उपक्रम सुरू होण्याची अपेक्षा होती.
मात्र, ते सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान सायबर चौकातून निघालेला मोर्चा सारथीच्या उपकेंद्रावर येऊन धडकला. यावेळी कार्यकर्त्यांनी सारथीच्या संथ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच थेट अधिकाऱ्यांनाच साकडे घालण्यात आले आहे.
सारथी उपकेंद्र
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणेचे उपकेंद्र कोल्हापुरात 26 जून 2020 रोजी सुरू झाले. या उपकेंद्राच्या माध्यमातून कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली या जिल्ह्यातील मराठा कुणबी घटकांसाठी संशोधन प्रशिक्षण व मानव विकास करिता उपक्रम सुरू होतील अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रशासनाने 26-6-2021 पासून या उपकेंद्रामार्फत स्थानिक पातळीवर एकही उपक्रम घेतला नाही. या उपक्रमाचे उद्घाटन झाल्यापासून या ठिकाणी सारथीने पुण्याची माहिती देण्यासाठी फक्त दोन कर्मचारी व एक अधिकारी नियुक्त केले आहे. यामुळे आता अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला आहे. सारथी पुणेच्या वतीने सध्या फेलोशिप यूपीएससी परीक्षा शिष्यवृत्ती हे दोन उपक्रम सुरू आहेत.
शालेय विद्यार्थांना शिष्यवृत्ती
आठवी आणि बारावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांना एक हजार रुपये शिष्यवृत्ती देणार आहेत. तसेच सारथी संस्थेचे शाहू महाराजांचे शंभरावे स्मृती शताब्दी वर्ष आहे. कोल्हापुरातील उपकेंद्राला आज समविचारी संस्था संघटना यांच्या वतीने सारथीच्या निर्मितीचा अहवाल आणि ध्येय उद्दिष्ट असलेले माहिती आधीच देण्यात आली आहे. याविषयी लक्ष वेध्यासाठी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर सांगली व त्याच्या जवळच्या जिल्ह्यात बेरोजगार तरुणांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी उपाययोजना कराव्यात या सर्व मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Chhagan Bhujbal stuck in Traffic jam : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; छगन भुजबळ तासभर अडकले