कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. शिवाय मृत्यूंची संख्या सुद्धा दररोज 50 च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होण्याचे नेमके काय कारण आहे?, हे शोधण्यासाठी आज कोल्हापूरात 'टास्क फोर्स' दाखल होणार आहे. डेथ ऑडिट सुद्धा या टास्क फोर्स कडून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 80 हजार 489 वर पोहोचली आहे. त्यातील 66 हजार 349 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 358 वर पोहोचली असून, एकूण मृतांची संख्या 2 हजार 782 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1 वर्षाखालील - 122 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2874 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 5821 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 44661 रुग्ण
51 ते 70 वर्ष -21544 रुग्ण
71 वर्षांवरील - 5468 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 80 हजार 489 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1) आजरा - 37
2) भुदरगड - 94
3) चंदगड - 34
4) गडहिंग्लज - 96
5) गगनबावडा - 17
6) हातकणंगले - 188
7) कागल - 101
8) करवीर - 124
9) पन्हाळा - 87
10) राधानगरी - 27
11) शाहूवाडी - 41
12) शिरोळ - 68
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 127
14) कोल्हापुर महानगरपालिका - 375
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 78
हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजेन तपासणी; 7 जण आले पॉझिटिव्ह